AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पेरणीचे नियोजन!
गुरु ज्ञानतुषार भट
हरभरा पेरणीचे नियोजन!
🌱हरभऱ्यासाठी मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. चांगल्या उत्पादनासाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान पेरणी करणे गरजेचे आहे. बियाणाची लागवड पेरून किंवा टोबून अशा दोन्ही पद्धतीने करू शकतो. पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर 30 सेंमी आणि दोन झाडांमधील अंतर 10 सेंमी ठेवावे. बियाणे 2 सेंमी पेक्षा जास्त खोलीवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. 🌱बियाणाची एकसमान उगवण होण्यासाठी तसेच सुरुवातीच्या अवस्थेत पिकाला बुरशीजन्य रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी मॅंकोझेब 63% + कार्बेन्डाझिम12% डब्लूपी घटक असणारे मँडोझ बुरशीनाशक @3 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा मेटॅलॅक्सिल 8% + मॅंकोझेब 64% WP घटक असणारे मेटल ग्रो बुरशीनाशक @3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. 🌱संदर्भ:-तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
3