AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योग्य नियोजनाने कमवा रोज ४ हजार रूपये!
व्यवसाय कल्पनाkrishi jagran
योग्य नियोजनाने कमवा रोज ४ हजार रूपये!
➡️शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरेल. या व्यवसायातुन तुम्ही चांगली कमाई करू शकता हा आहे केळ्यांचा चिप्स व्यवसाय. म्हणून शक्यतो ब्रँडेड कंपन्या या चिप्स बनवत नाहीत. म्हणून केळीच्या चिप्स ला जास्त मागणी आहे. ➡️केळीच्या चिप्स बनवण्यासाठी या सामानाची गरज :- केळीचे चिप्स बनण्यासाठी विविध मशीन ची गरज लागते. कच्चामाल म्हणून कच्ची केळी, मीठ, खाण्याचे तेल इतर मसाले लागतील.काही महत्त्वाच्या मशीन्स पुढीलप्रमाणे : १.केळी धुण्यासाठी टॅंक केळी सोडण्याचं मशीन २.केळीचेपातळ तुकडे कापण्याच मशीन ३.केळ्यांचे तुकडे तळण्याचं मशीन ४.मसाले मिसळण्याचा मशीन. ५.पाउच प्रिंटिंग मशीन. ६.प्रयोगशाळेतील उपकरणे. ➡️कुठून खरेदी करणार मशीन? मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 4 हजार ते 5 हजार चौरस फूट जागेची गरज लागेल. या मशिनची किंमत 28 हजारापासून 50 हजारापर्यंत आहे. ➡️50 किलो चिप्स बनविण्याचा खर्च :- 50 किलो चिप्स बनवण्यासाठी कमीत चिमणी 120 किलो कच्चा केळांची गरज आहे. 120 किलो कच्ची केळी तुम्हाला जवळजवळ एक हजार रुपयांना मिळतील. ➡️1 लाख रुपयाचा फायदा :- तुम्हाला 1 किलो वर 10 रुपयांचा फायदा होईल, असा विचार केला तर दिवसभरात 4 हजार रुपये कमवू शकता. तुम्ही महिन्यातले 25 दिवस तरी काम केलंत तरी महिन्याला 1 लाख रुपये सहज कमवू शकता. ➡️संदर्भ:Krishi Jagran. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
1
इतर लेख