AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब मर रोग नियंत्रणासाठी उपाययोजना!
गुरु ज्ञानAgrostar
डाळिंब मर रोग नियंत्रणासाठी उपाययोजना!
👉🏻डाळिंब लागवडीसाठी हलकी मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. 👉🏻लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली उन्हात तापून द्यावी लागवडीसाठी निरोगी रोपे निवडावीत. 👉🏻लागवड 4.5 मीटर * 3 मीटर अंतरावर करावी. त्यापेक्षा कमी अंतरावर लागवड करणे टाळावे. 👉🏻लागवड करतेवेळी खड्यांमध्ये तसेच बागेत बहार नियोजन करताना खतांची मात्रा देताना जमिनीतून जैविक अथवा रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा. 👉🏻बागेत प्रत्येक दोन-तीन महिन्यानंतर जमिनीतून ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि पॅसिलोमायसेस या जैविक बुरशीनाशक आणि सूत्रकृमीनाशकाचा वापर करावा. 👉🏻जेणेकरून मर रोग आणि सूत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फायदा होईल 👉🏻झाडांची सुप्तावस्था संपल्यानंतर बहार धरण्यापूर्वी 15 दिवस अगोदर झाडाच्या मुळांची छाटणी करावी तसेच जमिनीची योग्य पद्धतीने मशागत करावी. 👉🏻बागेस गरजेनुसार पाणी द्यावे. अतिरिक्त पाणी देणे टाळावे. 👉🏻खोड कीड, भुंगेरे तसेच सूत्रकृमी प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. 👉🏻 बागेत मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास जमिनीतून बुरशीनाशकाची आळवणी करावी. 👉🏻 यामध्ये मेटॅलग्रो, मँडोझ, कूपर 1, झिम्फ्लो यांसारख्या बुरशीनाशकांचा वापर करावा. 👉🏻मर रोगाने संपूर्ण वाळलेली झाडे उपटून नष्ट करावी. पुढे खड्डा निर्जंतुक करून नंतर त्यामध्ये नवीन रोपाची लागवड करावी. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
3
इतर लेख