AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात या जिल्ह्यात पावसाची शक्यता!
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
राज्यात या जिल्ह्यात पावसाची शक्यता!
➡️महाष्ट्रातील हवेचे दाबात सातत्याने बदल होत आहेत. रविवारी उत्तर बाजूस १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल तर महाराष्ट्राचे दक्षिण भागावर अद्याप १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. कोकण - कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी ११ मी. मी. व सोमवारी २२ मी. मी. पावसाची शक्यता आहे. पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील व किमान तापमान ढगाळ राहील. उत्तर महाराष्ट्र - जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील, धुळे जिल्ह्यात ते ३२ अंश ते ३३ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान किमान तापमान १५ अंश सेल्सिअस ,धुळे जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस आणि नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. मराठवाडा - जालना व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात कमल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. तर लातूर व नांदेड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील.उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व बीड जिल्ह्यात किमान तापमान १८ सेल्सिअस राहील. पश्चिम विदर्भ - बुलढाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. व किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ५० ते ५३ टक्के राहील. मध्य विदर्भ - यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान १८ अंश सेल्सिअस राहील. नागपूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. तर वर्धा जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. पूर्व विदर्भ - भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र - रविवारी कोल्हापूर जिल्ह्याचे पश्चिम भागात ९ मी मी व सोमवारी २२ मी मी पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. कृषी सल्ला -१) पूर्व हंगामी ऊस लागवड १५ नोव्हेंबर पर्यन्त करावी. २) विदर्भात पुरेसा ओलावा असलेल्या जमिनीत जवसाची पेरणी लागवड पूर्ण करावी ३) उत्तर कोकणातील व रत्नागिरी जिल्ह्यातील भाताचे हळवे परिपक्व झाले असल्यास कापणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
100
16
इतर लेख