AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फुलकोबी बटनिंग समस्येची लक्षणे व उपाय!
गुरु ज्ञानAgrostar India
फुलकोबी बटनिंग समस्येची लक्षणे व उपाय!
🌱फुलकोबी मध्ये नेहमीसारखा गड्डा न धरता बटनासारखा अगदी छोटा गड्डा तयार होतो तसेच घट्ट गड्डा तयार न होता एकएक फुले वेगळी होतात. insert पानांची वाढही खुंटलेली दिसते. हा दोष मुख्यतः नत्राच्या कमतरतेमुळे होतो. तसेच जास्त दिवस थंड वातावरण राहिल्यास, पाण्याची कमतरता, जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास, जास्त वयाची रोपे लागवडीस वापरल्यास अशा विविध कारणांमुळे हि समस्या फुलकोबी पिकामध्ये बघायला मिळते. याच्या नियंत्रणासाठी योग्य हंगामात योग्य वाणाची निवड करावी तसेच संतुलित अन्नद्रव्ये आणि पाणी व्यवस्थापन करावे. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
3
इतर लेख