सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
पिकातील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रस शोषक कीड नियंत्रण!
➡️टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय तसेच केळी, पपई अश्या विविध पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो.
➡️या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर यावर उपाययोजना करणे अशक्य असल्याने पिकाचे संपूर्ण नुकसान होते.
➡️विषाणूजन्य रोगांचे वहन पिकांमध्ये रस शोषणाऱ्या किडींमुळे होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकात रस शोषक कीड वेळीच नियंत्रित ठेवावी.
➡️कीड नियंत्रणासाठी सुरुवातीपासून चिकट सापळ्यांचा वापर करावा, पीक वाढीच्या अवस्थेत आंतरप्रवाही कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक आळवणी करावी.
➡️किडीचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून योग्य कीटकनाशची फवारणी करावी. पिकांची फेरपालट, जमिनीची मशागत व इतर मशागतीचे कामे याकडे विशेष लक्ष द्यावे.
➡️पिकात गरजेनुसार योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे जेणेकरून पीक कीड - रोगांना जास्त बळी पडणार नाही.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा