AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
घरबसल्या करा सुरु भन्नाट व्यवसाय!
व्यवसाय कल्पनाAgrostar
घरबसल्या करा सुरु भन्नाट व्यवसाय!
👉🏻आपण जर स्वताचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आपण अशा एका व्यवसायविषयी पाहणार आहोत, ज्याला गुंतवणूक कमी करावी लागेल आणि बचत चांगली होईल. तुम्ही घरबसल्या बटाटा चिप्स बनविण्याचा व्यवसाय करू शकता. हा व्यवसाय तुमच्यासाठी उत्तम ठरेल. यासोबत तुम्ही तांदूळ कुरकुरीत बनविण्याचा विचार देखील करू शकता. १) बटाटा चिप्स व्यवसाय : बटाटा चिप्स साठी साहित्य - बटाटा, मीठ, पाणी, तेल 👉🏻बटाटा चिप्स मशीन : बटाटा चिप्स बनविण्यासाठी तुम्हाला फक्त 850 रुपयांचं एक मशीन खरेदी करावे लागेल. तसेच सुरुवातीच्या टप्प्यात कच्चा माल खरेदी साठी १०० ते २०० रुपये खर्च होईल. 👉🏻चिप्स बनविण्याची प्रक्रिया : 1.बटाटे धुवून , सोलून घ्या. 2. नंतर पातळ काप करा. 3. काप केलेला तुकडा सुमारे 2 मिमी जाड असावा. 4. त्यानंतर बटाट्याचे तुकडे पाच मिनिटे पाण्यात ठेवा, या कालावधीनंतर पाणी काढून टाका. 5. बटाटे पारदर्शक होईपर्यंत आणि पाणी पांढरे होणे थांबेपर्यंत प्रक्रिया पार पाडा. 6. ही प्रक्रिया बटाट्यांमधून सर्व स्टार्च बाहेर काढण्यास मदत करते. 7.नंतर पॅन गरम करा आणि एक सेंटीमीटर जाड तेल घाला. 8.बटाट्याचे तुकडे दोन्ही बाजूंनी तळून घ्या, नंतर प्लेटवर ठेवा, भरपूर मीठ शिंपडा आणि थंड होऊ द्या. २) तांदळापासून कुरकुरे बनवण्याचा व्यवसाय: साहित्य- तांदूळ, जिरे,कलोंजी (काळे तीळ), पाणी, हळद, तळण्यासाठी तेल,मीठ,साखर 👉🏻तांदळापासून कुरकुरे बनविण्यासाठी मशीन : कुरकुरे बनवण्यासाठी तुम्ही जर मशीन विकत घेणार असाल तर बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या मशिन्स उपलब्ध आहेत. त्या तुम्ही होलसेल मार्केटमध्ये जाऊन विकत घेऊ शकता. जर तुमच्या बजेटमध्ये बसत असेल ती मशीन घेऊन तुम्ही मशीन विकत घेऊन कुरकुरे बनवू शकता. 👉🏻मशिनशिवाय तुम्ही कच्चे कुरकुरे सुद्धा होलसेल मध्ये विकत घेऊन त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे फ्लेवर्स टाकून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे पॅक करून विकू शकता. अशाप्रकारे व्यवसाय करून चांगला नफा कमवू शकता.
22
3
इतर लेख