AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भाजीपाला पिकांमधील सापळा पिके
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भाजीपाला पिकांमधील सापळा पिके
• टोमॅटो या पिकामध्ये फळ अळीचा प्रादुर्भावजास्त प्रमाणात आढळून येतो.फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी टोमॅटो पिकाभोवती मका लागवड करावी.त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी राहील.तसेच टोमॅटो पिकात झेंडूच्या ओळी लावल्यास किडी बरोबर सूत्रकृमी वाढीस देखील आळा बसतो. • कोबीवर्गीय पिकांमध्ये मोहरीच्या ओळी ठराविक अंतराने लावल्यास डायमंड बॅक मॉथ या पाने खाणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोबीवर्गीय पिकाची लागवड करण्यापूर्वी मोहरीची १५ ते २० दिवस अगोदर पेरावी. मोहरी पिकांवरील अळ्यांचा प्रादुर्भाव किटकनाशकांच्या फवारणीने नियंत्रण करता येते. • वांगी पिकांत झेंडू लागवडीचा फायदा घाटे अळी व सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे होतो.
• कोणत्याही पिकाच्या भोवती चवळीचे पीक घेतल्यास मुख्य पिकाचे माव्यापासून संरक्षण होते.चवळी ह्या पिकावर मावा कीड आकर्षित होते. सापळा पिकांची लागवड करताना • सापळा पिकाची लागवड दाट न करता ठराविक अंतर ठेवून करावी • मुख्य पिकांच्या ओळींमध्ये ठराविक अंतरावर सापळा पिकाची लागवड करावी.म्हणजे पिकांवरील किडींचे नियंत्रण सहज झाले पाहिजे. अग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
155
1