AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वेलवर्गीय पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी व्यवस्थापन!
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वेलवर्गीय पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी व्यवस्थापन!
• काकडी, दोडका व कारले यांसारख्या वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये अयोग्य फुलधारणा आणि फळधारणेमध्ये येणाऱ्या समस्यांसाठी प्रतिकूल वातावरणाचा ताण, लागवडीची अयोग्य वेळ व जातीची निवड, असंतुलित खतमात्रा, अयोग्य सिंचन व्यवस्थापन, परागीभवनामधील समस्या, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, अतिरिक्त शाकीय वाढ इत्यादी कारणे आहेत. • यासाठी वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी योग्य लागवडीचा हंगाम व कालावधीनुसार योग्य जातींची निवड करावी. • अन्नद्रव्यांची कमतरता किंवा असमतोल; तसेच अयोग्य वेळी वापर केल्यास फुलांची निर्मिती, फळधारणा कमी होते. • त्यासाठी माती परीक्षणानुसार पिकास मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पद्धतीने योग्य वेळी व योग्य मात्रेत वापर करावा. • पीक अवस्थेनुसार योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करावा. जमीन कायम वाफसा स्थितीत राहील, शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. • प्राधान्याने ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. परपरागीकरणासाठी मधमाशा, फुलपाखरे मदत करतात, त्यामुळे भाजीपाला उत्पादन क्षेत्रात किंवा जवळपास मधमाशीपालन करावे. • पीक फुलोरा अवस्थेत आल्यानंतर कीडनाशकांचा वापर टाळावा. ते शक्‍य नसल्यास मधमाशा/ मित्रकीटक यांना हानिकारक असलेली कीडनाशके वापरु नयेत किंवा जैविक कीडनाशकांचा वापर करावा. • फळांची काढणी योग्य अवस्थेत व योग्य वेळी करावी, जेणेकरून नवीन फुलांच्या निर्मितीसाठी व उपलब्ध फुलांच्या योग्य वाढीसाठी मदत मिळते. • तसेच लक्षणे व प्रादुर्भावानुसार वेळीच कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. फुलगळ व फळगळ थांबविण्यासाठी शिफारशीत संजीवकांचा योग्य त्या मात्रेमध्ये वापर करावा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
83
33