AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सामान्यांना मोठा दिलासा! उतरले डाळींचे दर!
कृषी वार्तान्यूज १८ लोकमत
सामान्यांना मोठा दिलासा! उतरले डाळींचे दर!
सामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सातत्याने वाढणाऱ्या डाळीच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. सर्वात जास्त घसरण उडीद आणि चणाडाळीच्या किंमतीत झाली आहे. एप्रिल महिन्यात चणाडाळीच्या किंमतींमध्ये रेकॉर्ड लेव्हलवरून 20 टक्के घसरण पाहायला मिळाली होती. याशिवाय उडद डाळीच्या किंमतीमध्ये देखील 20 टक्के घसरण झाली आहे. कोरोना काळात मागणी कमी झाल्यान डाळींच्या किंमती उतरल्या आहेत. चणा डाळीच्या किंमती एमएसपीच्या स्तरावर 5,100 रुपये प्रति क्विंटलच्या खाली आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या काळात चण्याचा किंमतींवर दबाव राहण्याची शक्यता आहे. कोविडच्या तिसर्‍या लाटेदरम्यान संभाव्य घसरण आणि फेस्टिव्ह सीझनआधी होणारी मागणी यामुळे आणखी किंमती वाढविण्याची शक्यता आहे. नाफेड मधील भारतीय डाळी आणि धान्य असोसिएशनचे अध्यक्ष जीतू भेडा म्हणाले, कोविडमुळे मागणी कमी झाली आहे शिवाय नाफेडने स्थानिक बाजारपेठेत चणा विक्रीला सुरुवात केली आहे, ज्यामुळे किंमती खाली आल्या आहेत.. इंदूरमध्ये ऑल इंडिया डाळी मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल यांनी असं म्हटलं आहे की, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या उपायांमुळे डाळींच्या वापरावर परिणाम झाला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, 'यावेळी किंमती 5000 रुपयांच्या आसपास आहे आणि यापुढे आणखी कमी होतील अशी शक्यता नाही कारण पुढील पीक येण्यास अजून वेळ आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार होण्याची भीती आणि सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे चण्याच्या वापरामध्येही वाढ होण्याची शक्यता कमी आहे'. तुर आणि मुगडाळीच्या किंमती उतरल्या त्यांनी पुढे अशी माहिती दिली की तुर आणि मुगडाळीच्या किंमती देखील उतरल्या आहेत. अग्रवाल यांनी असं म्हटलं आहे की, दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या प्रगतीच्या आधेर चणाबाजारात सुधारणा होऊ शकते. वायदे बाजारात गेल्या काही सत्रांपासून चण्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.
6
1
इतर लेख