AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उन्हाळी कलिंगड आणि खरबूज पिकातील फळ माशीचे नियंत्रण
• प्रौढ मादी माशी फळाच्या सालीमध्ये अंडी घालते. • अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या फळांमध्ये शिरतात व आतील गर खातात. • प्रादुर्भावग्रस्त लहान फळे जमिनीवर पडतात. • हि फळे कुजतात व त्यामधून दुर्गंधीत वास येतो. • फळांचा आकार बदलतो. • जिथे अंडी घातलेली असतात तिथून फळातून चिकट द्रव बाहेर येतो. हा द्रव वाळतो आणि त्याचे तपकिरी रंगाच्या डिंकात रूपांतर होते. • यामुळे, फळावर डाग पडतात आणि फळाची गुणवत्ता घसरते.
• या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास पिकाचे १००% नुकसान होण्याची शक्यता असते._x000D_ • ही कीड उष्ण हवामानात अधिक सक्रिय असते._x000D_ • याच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त फळे आणि डाग पडलेली फळे गोळा करून मातीत गाडून नष्ट करावीत. _x000D_ • पीक नेहमी तणमुक्त ठेवावे._x000D_ • पिकाच्या भोवती एक दोन ओळी मका पिकाची लागवड करून त्यावर नियमित कीटकनाशकाची फवारणी करावी._x000D_ • प्रौढ माशीच्या नियंत्रणासाठी गूळ @ ४५० ग्रॅम १० लिटर पाण्यात विरघळवून २४ तास ठेवा आणि फुलधारणा सुरुवात झाल्यास आठवड्यातून एकदा १० मिली डीडीव्हीपी मिसळून पीकांवर फवारणी करावी._x000D_ • फळ माशीच्या नरांना आकर्षक करून नष्ट करण्यासाठी प्रति एकरी 'क्यू ल्युर सापळे' @ ८ ते १० प्रत्येकी १ मीटर अंतरावर लावावे. _x000D_ • सापळ्यांमधील माश्या प्रत्येकी २ आठवड्यांनी काढून नष्ट कराव्यात. _x000D_ • पीक कालावधीत असे सापळे प्रभावी असतात, त्यामुळे हे सापळे बदलू नयेत._x000D_ • शेतात एकमेकांना समान अंतरावर सापळे स्थापित करा._x000D_ • जर सापळे लाकडी काठीच्या सहाय्याने स्थापित करत असाल तर त्याला वाळवी लागणार नाही याची काळजी घ्यावी._x000D_ • हवा किंवा वार्‍यामुळे सापळे पडणार नाहीत अश्या पद्धतीने सापळे बसवावेत._x000D_ • कुत्रे किंवा इतर जनावरांपासून सापळ्यांचे संरक्षण करावे._x000D_ _x000D_ Video Source: vaibhav jamma MACL SOLAPUR_x000D_ हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा._x000D_ _x000D_ _x000D_
378
2
इतर लेख