AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद दरात सुधारणा; जाणून घ्या बाजारभाव!
समाचारअ‍ॅग्रोवन
हळद दरात सुधारणा; जाणून घ्या बाजारभाव!
➡️ देशात हळदीची ४० ते ५० लाख (एक पोते ५० किलोचे) हळद शिल्लक आहे. गेल्या पंधरा दिवसांत हळदीच्या दरात सुमारे २०० ते ३०० रुपयांनी दर वाढले असून, सध्या हळदीला ६५०० ते ९००० हजार प्रति क्विंटल असा दर असून दर टिकून आहेत. फेब्रुवारी २०२२ पर्यंत अंदाजे ३५ लाख पोत्यांची विक्री होईल, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. ➡️ देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू असतानाच हळदीच्या विक्री काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडील हळदीची विक्री झाली आहे. मात्र हळदीच्या दरात वाढ होईल, या आशेने शेतकऱ्यांनी हळदीची साठवणूक केली आहे. तसेच व्यापाऱ्यांनी देखील हळदीची साठवणूक केली असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले आहे. ➡️ गेल्या महिन्यात हळदीच्या दरात सातत्याने किलोमागे एक ते दोन रुपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. वास्तविक पाहता गेल्या पंधरा ते वीस दिवसांत हळदीच्या दरात प्रति क्विंटलला २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. ➡️ देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात हळदीला पोषक असे वातावरण आहे. अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस झाला आहे. त्यामुळे हळदीची वाढही चांगल्या प्रकारे झाली आहे. सांगली बाजार समितीत हळदीची सुमारे १५०० ते २००० क्विंटल आवक होत आहे. ➡️ देशात अजूनही कोरोनाचे सावट आहे परंतु येत्या काळात हळदीच्या मागणीत काही प्रमाणात वाढ होईल, त्यामुळे दरात वाढ होईल, अशा अंदाज आहे. सध्या हळदीचे दर टिकून आहेत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
39
11
इतर लेख