AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सौरऊर्जेच्या विजेतून पैसे कमवा!
कृषी वार्तासकाळ
सौरऊर्जेच्या विजेतून पैसे कमवा!
➡️ नापीक आणि अकृषक जमिनीचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाद्वारे प्रधानमंत्री कुसूम योजना सुरू करण्यात आली आहे . शेतीला पाण्याची सोय व्हावी हा यामागचा हेतू आहे . या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विजेपासून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे . ➡️ या योजनेद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण होणाऱ्या वीज प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे . त्यामुळे योजनेचा तर लाभ घ्या शिवाय उत्पन्नही मिळवा, अशी ही शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी योजना आहे. आता सौर पंपाची उभारणी करून पाण्याचा प्रश्न तर मार्गी लागणार आहे पण , सौरपंप उभारून शेतकरी विजेची विक्री करून चांगले रुपये कमविण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे .. ➡️ यांना प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्य या योजनेअंतर्गत पॉईंट ०.५ ते २ मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रीकृत सौर ऊर्जा प्रकल्प प्राधान्याने शेतकरी , शेतकरी सहकारी संस्था , पंचायत , शेतकरी उत्पादक संस्था ( एफबीओ ) आणि पाणी वापर कर्ता संघटना ( डब्ल्यूयूए ) विकसित करू शकतात .अशा परिस्थितीत भाडेपट्टी कराराद्वारे जमीन मालकाला त्यांच्या जमिनीचे भाडे मिळणार आहे . ➡️ हे प्रकल्प जमिनीवरील सौर प्रकल्पाची उभारणी स्टीलट रचना वापरूनही उभारता येईल . जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा वापर पिकांच्या लागवडीकरिता होऊ शकेल . या योजनेत शेतकरी त्यांच्या बँक खात्यामध्ये विकासकाद्वारे जमिनीचे मिळणारे भाडे हे महावितरण मार्फत जमा करण्याचा पर्याय निवडू शकतील . हा सौर ऊर्जा प्रकल्प महावितरणच्या जवळपास ३३/११ उपकेंद्राशी थेट जोडला जाईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- सकाळ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
59
14
इतर लेख