AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेती उपकरणे खरेदी करायला सरकार देतंय अनुदान !
समाचारkrishi jagran
शेती उपकरणे खरेदी करायला सरकार देतंय अनुदान !
➡️देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे विविध योजना राबवतात.आता शेतकऱ्यांना कृषी उपकरणांवर सुमारे 50 ते 80 टक्के सवलत मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तुम्हालाही या सवलतीचा फायदा घेता येऊ शकतो. या योजनेचे नाव 'स्माम' योजना असून याद्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाते. ➡️योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: १.आधार कार्ड, २.वास्तव्याचे प्रमाणपत्र, ३.सातबारा उतारा, ४.बँक पासबुक, ५.मोबाइल क्रमांक, ६.जातीचा दाखला, ७.पासपोर्ट आकाराचा फोटो या कागदपत्रांची आवश्यकता आहे. ➡️यासाठी तुम्हाला सर्वात आधी https://agrimachinery.nic.in/ या संकेतस्थळावर लॉगिन करून या ठिकाणी Registration हा पर्याय दिसेल. त्यामध्ये तुम्हाला शेतकरी( farmer ) हा पर्याय निवडावा लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यास एक पेज सुरू होईल. त्यावर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. त्यानंतर नाव, आधार क्रमांक नमूद करा. त्यानंतर तुम्हाला अर्जात संपूर्ण माहिती भरावी लागणार. सबमिट या पर्यायावर क्लिक करा. तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच कोणत्याही शेतकऱ्याला या स्माम योजनेचा लाभ मिळू शकतो. यामध्ये केंद्र सरकार शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांवर बाजारातील दरावर 50 ते 80 टक्के अनुदान देते. शेती उत्पादन वाढवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये आधुनिक उपकरणे वापरण्यास प्रोत्साहन देते. यामुळे शेतकऱ्यानो या योजनेचा फायदा घ्या. ➡️संदर्भ: Krishi Jgaran. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
63
10
इतर लेख