AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेती उपकरणांसाठी 50 ते 80% अनुदान!
योजना व अनुदानAgrostar
शेती उपकरणांसाठी 50 ते 80% अनुदान!
➡️देशातील शेतकरी बांधवांना सहज शेती करता यावी यासाठी केंद्र सरकारने स्माम किसान योजना 2022 सुरू केली आहे. आजच्या काळात शेतीसाठी आधुनिक उपकरणे आवश्यक आहेत हे आपणा सर्वांना माहीतच आहे, त्यामुळे या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून ५० ते ८० टक्के अनुदान आर्थिक सहाय्य स्वरूपात दिले जाईल. ➡️स्माम किसान योजना 2022 : देशातील इच्छुक लाभार्थी ज्यांना सरकारच्या या योजनेअंतर्गत लाभांसाठी अर्ज करायचा आहे, तर ते योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही योजना देशातील सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे, देशातील कोणताही शेतकरी जो या स्माम किसान योजना 2022 साठी पात्र आहे तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि महिला शेतकरी देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. केंद्र सरकारची कृषी यंत्र योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना कृषी यंत्रावर अनुदान मिळू शकते. स्माम किसान योजना 2022 मध्ये, सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना कृषी यंत्रे खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ➡️स्माम योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या .www.agrimachinary.nic.in ➡️संदर्भ:Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."
28
9
इतर लेख