AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतीतील खेळत्या भांडवलासाठी अल्प मुदत कर्ज !
कृषी वार्ताAgrostar
शेतीतील खेळत्या भांडवलासाठी अल्प मुदत कर्ज !
➡️ सामान्यत: पीककर्ज हे संकरित बी-बियाणे खरेदी, खतांची खरेदी, किडनाशके, तणनाशके खरेदी, ट्रॅक्टर व अन्य यंत्र, अवजारांचे भाडे, मजुरी, वीजबिल, पाणीपुरवठ्यावरील खर्च, पीक काढणी, साठवणूक खर्च इ. बाबीसाठी दिले जाते. ➡️ पिकाच्या व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. उदा. पूर्वमशागत, बी-बियाणे खरेदी, खते, कीडनाशके, तणनाशके, आंतरमशागत, पीक काढणी, पीक साठवण आणि विक्रीसाठी वाहतूक वगैरे अशा अनेक बाबींसाठी खर्च होत असतो. त्यासाठी अल्प मुदतीचे कर्ज म्हणजेच पीककर्ज बॅंकेकडून उपलब्ध केले जाते. पीक उत्पादनाच्या कालावधीनुसार या पीककर्जाची परतफेड ठरवली जाते. ➡️ पीक कर्ज कोणाला मिळते? 👉🏻वैयक्तिक शेतकरी, नोंदणीकृत भागीदारी फर्म, कंपनी आणि नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था. 👉🏻स्वतःच्या नावे शेती असलेले प्रगतिशील शेतकरी वा संस्था. 👉🏻संकरित बीज उत्पादक शेतकरी, बीज उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शनाखाली बीज उत्पादन करतात. ➡️पीककर्ज प्रमाण :- जिल्ह्यात लागवड होणाऱ्या पिकासाठी पीककर्ज प्रमाण हे जिल्हास्तरीय समिती ठरवते. या समितीचे आमंत्रक ही त्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक असते. तर समितीचे अन्य सभासद १) जिल्ह्यातील प्रमुख बँकेचे प्रतिनिधी २) जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक ३) निमंत्रित प्रगतिशील शेतकरी ४) नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक आणि ५) राज्य शासनाच्या शेती विभागाचे प्रमुख. ही समिती दर वर्षी जिल्ह्यातील पीक लागवडीस येणाऱ्या खर्चाचा विचार करून पीककर्ज प्रमाण ठरवते. ते पीककर्ज प्रमाण जिल्ह्यातील सर्व बँका अंमलात आणतात. ➡️ पीककर्ज आणि त्यावरील व्याज आकारणी : पीककर्जाचा जो परत फेडीसाठीचा कालावधी असतो, तोपर्यंत या कर्जास सरळ व्याज दराने व्याज आकारले जाते. दिलेल्या मुदतीत पीककर्जाची परत फेड न झाल्यास मुद्दल आणि मुदतीपर्यंत लावलेले व्याज यावरही व्याज आकारले जाते. मुदतीनंतर व्याजावर व्याज लागते. म्हणजेच पुढील आकारणी ही चक्रवाढ व्याज पद्धतीने होते. ➡️कर्जदारास फायदे : १) इतर वेळी पैसे काढण्यासाठी बँकेत व बँकेच्या वेळेत जावे लागते. सुट्टीच्या दिवशी पैसे काढता येत नाहीत. मात्र किसान क्रेडिट कार्डमुळे आठवड्याचे सातही दिवस, २४ तास कधीही एटीएममधून पैसे काढता येतात. बँकेत जाण्याचा वेळ वाचतो. २) खते, बी-बियाणे आणि कीडनाशकांची खरेदी करता येते. ३) रोख पैसे बाळगण्यातील धोके कमी होतात. ४) आवश्यकतेवेळीच कार्ड वापरून पैसे काढल्याने तितक्याच कर्जाचा वापर होतो. म्हणजे तेवढे कमी व्याज भरावे लागते. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
3
इतर लेख