AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांसाठी जाहीर निवेदन,पंचगंगा बियाणे बाबत!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
शेतकऱ्यांसाठी जाहीर निवेदन,पंचगंगा बियाणे बाबत!
➡️ सध्या बाजारात पंचगंगा बियाणे पॅकिंगची बनावट व बोगस बियाणे विकले जात आहे. पंचगंगा हि पॅकिंग बनावट /बोगस येत आहे.प्रत्येक पाकिटावर जी काही बियाणे पॅकिंगची माहिती आहे. जसे कि , सत्यप्रत लेबल क्र. व लॉट हे पाकिटावर एकच असून ते खोटे आहे.तसेच पाकिटावर किंमत १९००/ प्रति पॅकेट आहे. कंपनी ची मूळ किंमत १४०० रुपये आहे. तरी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी ओरिजिनल बियाणे कसे ओळखावे खालील प्रमाणे आहे. ➡️ सदर बियाणे पाकिटे ज्याचे सत्यप्रत लेबल क्र. व लॉट नंबर हे प्रत्येक पाकिटावर एकसारखे आहे असे बियाणे पाकिटे जर दुकानदार व इतर कोणीही बिगर बिलाचे आपणास विक्री करत असेल किंवा आपण खरेदी केलेले असेल तर शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे बोगस बियाणे पाकीट दुकानदारास परत करावे. ➡️ पंचगंगाशी संपर्क -सदर बाबत कंपनीच्या संपर्क क्र. ९०२२१४७९९३ वर संपर्क करावा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ -अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
27
7