AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांना मिळणार ४ लाखांचे अनुदान!
कृषि वार्ताAgrostar
शेतकऱ्यांना मिळणार ४ लाखांचे अनुदान!
👉🏼 अनेक शेतकऱ्यांनी मनरेगा अंतर्गत सिंचन योजनेसाठी अर्ज केलेला होता त्याचप्रमाणे त्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे. शासनांतर्गत मनरेगा सिंचन योजने साठी काही घोषणा केलेल्या होत्या त्यामध्ये विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान मिळणार होते. 👉🏼 अनेक शेतकऱ्यांनी सिंचन योजनेसाठी अर्ज केलेला होता व शेतकरी योजनेच्या यादीचे आतुरतेने वाट बघत असताना आता पात्र शेतकऱ्याची यादी जाहीर झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी सिंचन योजने करिता अर्ज भरलेले होते. त्या त्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांची यादीमध्ये निवड झालेली आहे. 👉🏼 यादीत तुमचे नाव चेक करण्याची प्रक्रिया पहा 👇🏻 👉🏼 अर्जदाराला स्वतःचे नाव यादीमध्ये चेक करण्यासाठी मनरेगाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल,nrega.nic.in या पोर्टलवर गेल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने जनरेट रिपोर्ट ऑप्शन वर क्लिक करा. 👉🏼त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा तालुका,गाव निवडा येथे आहे सर्व निवडल्यानंतर प्रोफाइल बटणावर क्लिक करा. 👉🏼त्यानंतर वर्क स्टेटस असे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर एक लिस्ट दिसेल त्यातील वैयक्तिक काम हे ऑप्शन निवडा. 👉🏼त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर मागेल त्याला विहीर अनुदान योजना अंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांची यादी दिसेल. 👉🏼ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेला होता त्या शेतकऱ्यांनी स्वतःचे नाव चेक करावे, अर्जदाराचे नाव यादीमध्ये असेल तर अर्जदार मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत पात्र ठरलेले आहे. 👉🏼त्याचबरोबर किती रुपये अनुदान मंजूर झालेली आहे हे सुद्धा स्क्रीनवर दाखवण्यात येईल. अशाप्रकारे अर्जदार आपल्या स्वतःचे नाव यादीमध्ये आहे की नाही हे चेक करू शकतात. 👉🏼संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
6
इतर लेख