AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांना अपघात समयी भक्कम आर्थिक आधार देणारी योजना !!!
कृषी वार्ताAgrostar
शेतकऱ्यांना अपघात समयी भक्कम आर्थिक आधार देणारी योजना !!!
"शेतकऱ्यांना शेतीत काम करीत असताना बऱ्याचदा अनिष्ट प्रसंगांना सामोरे जावे लागते.त्यातल्या त्यात पावसाळ्यात प्रामुख्याने वीज पडणे,पुरात वाहून जाणे, रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना बरेचदा सर्पदंश, विंचू चावणे तसेच इलेक्ट्रिक पंप चालू करताना विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर ओढवतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना नंतर त्यांच्या कुटुंबांना लाभ दायक ठरेल अशी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली आहे. या योजनेचे अगोदर चे नाव शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना असे होते व ती सन 2005-06 पासून सुरू करण्यात आली आहे. योजना 2015 पासून सुरू करण्यात आली असून आता या योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपयांचा विमा संरक्षणसह शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. ➡️लाभार्थी पात्रता:- महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला शेतकऱ्याच्या कुटुंबातील १० ते ७५ वयोगटातील वर नमूद केलेला कोणताही १ सदस्य. या योजनेच्या विहीत कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या चोवीस तासांसाठी योजना लागू राहील. या कालावधीत शेतकऱ्याला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही तो या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र आहे. ➡️एकंदरीत योजनेचे स्वरुप अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते. शेतकऱ्याला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्यात येते. ➡️विम्याचा दावा दाखल करताना आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा, 6क, सहा ड ( फेरफार उतारा), एफ आय आर, पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, व्हिसेरा रिपोर्ट, दोषारोप, दावा अर्ज, वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक, घोषणापत्र व घोषणापत्र ब( अर्जदाराच्या फोटोसह), वयाचा दाखला, तालुका कृषी अधिकारी पत्र, घटनास्थळ पंचनामा, इनक्वेस्ट पंचनामा, वाहन चालवण्याचे लायसन्स, अपंगत्वाचा दाखला व फोटो, औषधोपचाराचे कागदपत्रआणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अपघात नोंदणी 45 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. ➡️तसेच शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या वतीने कोणत्याही संस्थेने वेगळी विमा योजना लागू केली असल्यास अथवा विमा उतरवला असल्यास त्याच्या या योजनेशी काहीही संबंध असणार नाही. या योजने अंतर्गत मिळणारे लाभ हे स्वतंत्रपणे असतील. ➡️ संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. "
10
1
इतर लेख