AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रेशीम शेती, लागवड ते काढणी असे करा नियोजन!
नई खेती नया किसानTV 9 marathi
रेशीम शेती, लागवड ते काढणी असे करा नियोजन!
➡️ शेतकरी मित्रांनो,सध्या तुती लागवडी कडे शेतकरी वळत आहेत. तर आज आपण बगूया तुती बद्दल माहिती,महाराष्ट्र राज्याची कृषि विषयक हवामानाची परिस्थिती बघता तुती पाल्याचे बारमाही उत्पादन घेता येऊ शकते तुती लागवडीसाठी 750 मिलि. मी. ते 1000 मिलि.मी. पाऊस वर्षभर समप्रमाणात पडत असलेल्या भागात लागवड केल्यास तुतीला पोषक वातावरण मिळून पाल्याचे उत्पादन वाढते. ➡️तुतीची लागवड व देखभाल तुती बेणे तयार करणे: तुती लागवड तुतीबेण्या पासून करायची असते. त्यासाठी एम-5, एस-54, एस-36, व्ही -1 अशा सुधारीत जातीची बेणे वापरावीत. बेणे तयार करतांना 6 ते 8 महिने वयाच्या तुती झाडांची 10 ते 12 मि.मि. जाडीच्या फांद्या निवडण्यात याव्यात व बेण्याची लांबी 6 ते 8 इंच असावी. त्यावर किमान 3 ते 4 डोळे असावेत व तुकडे करातांना धारदार कोयत्याने तुकडे करावेत कोवळया फांद्या बेणे तयार करण्यासाठी वापरु नयेत. ➡️तुती लागवड करतांना घ्यावयाची काळजी : 1) लागवडीकरिता किमान सहा महिने जूने व बागेस पाणी दिलेले तुती बेणे वापरावे. त्यानंतर 2) तुती बेणे छाटणी केल्यापासून 24 तासांच्या आत लागवड केल्यास त्याचा फुटवा चांगला होतो व बागेत तुट अळी पडत नाही. 3) तुती बेणे छाटणी धारदार हत्याराने किंवा सिकॅटरने 3 ते 4 डोक्यावरच करावी. जास्त लांब काडी तोडू नये. 4) तुती लागवडीमध्ये नैसर्गिकरित्या 10 ते 15 % तुती अळी पडत असल्याने प्रती एकर किमान तुट अळी भरण्यासाठी 1000 रोपांची वेगळी रोपवाटीका करावी. ➡️तुती झाडांची छाटणी : छाटणी केल्यानंतर तुती झाडापासुन सकस व भरपुर पाला मिळतो. कमीपाण्याच्या (आठमाही) क्षेत्रामध्ये तुतीझाडाची प्रथम छाटणी जमिनीपासून एक फुटाच्यावर करावी एक फुटापर्यंत तुती झाडास आडवी फांद्यी न वाढू देता सरळ खोड वाढू द्यावे व पुढील छाटणी एक फुटाचे वर करावी. जिरायत तुती लागवड क्षेत्रात वाढविलेल्या तुती झाडाची दीड ते दोन वर्षानी 4 ते 5 फुट उंचीवर छाटणी करावी व त्यानंतर प्रत्येक पीकानंतर दोन डोळे ठेऊन फाद्याची छाटणी करवी. ➡️संदर्भ: TV 9 marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
0