AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात पुन्हा पाऊस! 'या' जिल्ह्यांना अलर्ट!
हवामान अपडेटसकाळ
राज्यात पुन्हा पाऊस! 'या' जिल्ह्यांना अलर्ट!
➡️गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढले आहे . काही ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत पण , वातावरणात अचानक बदल झाला असून येत्या तीन ते चार तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आहे. ➡️याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान विभागान अंदाज व्यक्त केला आहे . सुनावणीला राज्यातील नाशिक , धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येत्या तीन ते चार तासांत सोसाट्याचा वारा , वादळ , विजांचा कडकडाट आणि जोरदार मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे , असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे . ➡️राज्यात ५ मार्चपर्यंत पावसाची शक्यता - आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे . त्यामुळे पुण्यासह दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात येत्या पाच मार्चपर्यंत पावासाची शक्यता आहे ➡️तामिळनाडू , पुडुचेरी आणि कराईकलसह दक्षिणेकडील भारताच्या काही द्वीपकल्पीय भागांमध्ये जोरदार अतिवृष्टीची शक्यता आहे . ➡️ उन्हाची तीव्रता कमी होणार - राज्यात तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा जाणवत होत्या .आता पावसाच्या सरी बरसल्यानंतर नागरिकांना उन्हापासून काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे . संदर्भ:-Sakal, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
1
इतर लेख