AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता!
हवामान अपडेटअॅग्रोवन
राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता!
➡️ मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात गेल्या तीन दिवसांपासून चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आज (ता.५) पावसाची काहीशी उघडीप राहणार असून उन्हाचा चटका वाढेल. मात्र, गुरुवारपासून पुन्हा तुरळक ठिकाणी वादळ, विजांच्या कडकडाट व गारपीटीसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. ➡️ गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोमोरीन परिसर व दक्षिण तमिळनाडू परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तसेच मध्य प्रदेश व परिसरात व वायव्य भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तर मध्य प्रदेशचा वायव्य भाग ते मणिपूर या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याशिवाय उत्तर कर्नाटक ते कोमोरिन परिसर, दक्षिण तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने भूपृष्टावर येत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भ काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. त्यामुळे मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात गारपीटीसह जोरदार पाऊस पडत आहे. ➡️ राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस गुरुवार :- सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, संपूर्ण विदर्भ. शुक्रवार :- संपूर्ण महाराष्ट्र. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
70
16
इतर लेख