AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात आठवडाभर पडणार मुसळधार सरी!
हवामान अपडेटलोकमत
राज्यात आठवडाभर पडणार मुसळधार सरी!
➡️ गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पहायला मिळाला. तर राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणारा असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ➡️ मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. ६ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे ➡️ मुंबईसह राज्यभरात ९ सप्टेंबरपर्यंत गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा प्रभाव राहणार असून, ७ आणि ८ सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे. ➡️ मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. ६ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ➡️ ७ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि अकोला या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मुंबई शहर आणि उपनगरातही पावसाच्या सरी कायम आहेत. सोमवारीही कमी अधिक फरकाने मुंबईत हीच परिस्थिती राहील, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. ➡️ या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी या पिकांना फायदा झाला आहे. परंतु काढणीला आलेल्या मुगासह उडदाचे मात्र नुकसान होत आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
73
8
इतर लेख