AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या योजनेअंतर्गत बनवा आपले रेशन कार्ड !
समाचारAgrostar
या योजनेअंतर्गत बनवा आपले रेशन कार्ड !
➡️रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने अनेकजण रेशनकार्डपासून वंचित राहिलेले पाहायला मिळत आहे. मात्र आता अशा सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ➡️वन नेशन वन रेशनकार्ड योजनेंतर्गत रेशनकार्ड प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. त्यामुळे आता घरबसल्या रेशनकार्ड काढता येणार आहे. रेशनकार्डचा लाभ घेता यावा यासाठी भारत सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजना हा प्रमुख कार्यक्रम सुरू केला आहे. वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचीअधिकृत वेबसाइट www.impds.nic.in आहे. रेशन कार्ड योजना सुरू झाल्यापासून, 24 राज्यांतील 69 कोटी लोकांना या योजनेचा लाभ झाल्याचा अंदाज आहे. ➡️राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत वन नेशन वन रेशन कार्ड योजना सार्वजनिक वितरण प्रणालीमधून अनुदानित धान्य खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना राज्य सरकार शिधापत्रिका प्रदान करते. ➡️रेशनकार्ड होणार उपलब्ध : असुरक्षित घटकांना शिधापत्रिका वितरित करण्यासाठी आणि त्यांना अन्न सुरक्षा प्रदान करण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ➡️मे महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेसह अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या. अर्थव्यवस्थेतील तरलतेच्या संकटाचा सामना करण्यासाठी ही घोषणा 20 लाख कोटींच्या पॅकेजचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की वन नेशन वन रेशन कार्ड योजनेसाठी तंत्रज्ञान प्रणाली वापरली जाईल, ज्यामुळे स्थलांतरितांना मार्च 2022 पर्यंत भारतातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून रेशन कार्ड मिळू शकेल, अशी माहिती देण्यात आली होती. ➡️ संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
4
इतर लेख