AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
यंदा मान्सून वेळेवर होणार दाखल १ जून केरळमध्ये हजेरी!
कृषी वार्तामहाराष्ट्र टाइम्स.कॉम
यंदा मान्सून वेळेवर होणार दाखल १ जून केरळमध्ये हजेरी!
➡️ मे महिन्यात एकीकडे कोरोनामुळे चिंतेत असताना दुसरीकडे उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसामुळे नागरिक त्रस्त आहेत. पण या सगळ्यात बळीराजासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाहीतर चार महिन्यांत म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ➡️ मान्सून विभागाच्या म्हणण्यानुसार, १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या ९८ टक्के राहील, असा अंदाज आहे तर 15 मे रोजी भारतीय हवामान विभाग पावसाचा पुढचा अंदाज सांगणार आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ➡️ पावसाळ्याआधी शेतीची अनेक काम सुरू झाली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी धान्याची पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा वेळेवर दाखल होणार मान्सून हा शेतकऱ्यांसाठीदेखील लाभदायक असणार आहे. भारतातील सुमारे २०० दशलक्ष शेतकरी धान्य, ऊस, मका, कापूस आणि सोयाबीन यासारख्या अनेक पिके पेरण्यासाठी मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करतात. ➡️ यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे देशातील जवळपास ५० टक्के शेतीयोग्य जमिनीत सिंचनाची सुविधा नाही. यामुळे, कृषी उत्पादन भारताच्या अर्थव्यवस्थेच्या फक्त १४ टक्के आहे. खरंतर, या क्षेत्रात देशातील ६५ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आहेत. भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे, म्हणजेच ५० टक्के लोकांना शेती व शेतकर्‍यांमध्ये रोजगार मिळाला आहे. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -महाराष्ट्र टाइम्स.कॉम, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
85
27
इतर लेख