AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मागेल त्याला विहीर!
योजना व अनुदानAgrostar
मागेल त्याला विहीर!
➡️शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने विविध समाज घटकांतील शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला विहीर' ही योजना सुरू केली. मागेल त्याला विहीर ही योजना शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारकडून सिंचनाच्या सोयीवर भर दिला जातो. ➡️या योजनेंतर्गत पूर्वी विहिरीच्या बांधकामासाठी 2 लाख 99 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. मात्र, आता या योजनेच्या अनुदानात शासनाने 26 हजारांची वाढ केली आहे. मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता 3 लाख 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. वाढीव निधीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ➡️साहित्याचा वाढता खर्च, मजुरी लक्षात घेता या अनुदानात 3 लाख रुपयांमद्धे वाढ करून 3 लाख 25 हजार रुपये करण्यात आले आहे. मागेल त्याला विहीर या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका स्तरावरील कार्यालयाशी संपर्क करावा. व यानंतर सर्व प्रश्नांचे निरासरन झाल्यास अर्ज करावा. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
9
इतर लेख