AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महिला शक्ती- 1200 शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीकडे वळवले!
द बेटर इंडियाThe Better India
महिला शक्ती- 1200 शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीकडे वळवले!
➡️ देशात सिक्कीम राज्य हे सेंद्रीय शेतीसाठी ओळखले जाते. आता, नव्याने मध्य प्रदेश हे राज्यदेखील सेंद्रीय शेतीसाठी तग धरू लागले आहे. या राज्यात सेंद्रिय शेती योजनेत 16 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि त्यातील 1,800 गावांमध्ये मॉडेलचा सराव केला जात आहे. याचे संपूर्ण श्रेय प्रतिभा ताईना दिले जाते. ➡️ गणितात पदव्युत्तर पदवी घेऊन, प्रतिभा ताई यांनी शेतीमध्ये करिअर करण्याची कल्पना कधीच केली नव्हती. लग्न झाल्यावरच त्यांनी सासरच्यांना शेती करताना पाहिले. हळूहळू, त्यांनी स्वत: देखील शेतीमध्ये सराव करण्यास सुरुवात केली, तसेच कृषी विषयांवर संशोधन केले आणि रासायनिक शेतीच्या हानिकारक प्रभावांची ओळख करून घेतली. त्यामुळे त्यांनी सेंद्रिय शेतीचा सराव सुरू केला आणि इतर शेतकऱ्यांनाही अशा पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. ➡️ यासर्व प्रक्रियेमध्ये प्रतिभाताईंचे मोठे योगदान आहे. 2016 मध्ये त्यांनी ब्रेनचाइल्ड भूमिशा ऑरगॅनिक्सची सुरूवात केली.यामुळे शेकडो शेतकऱ्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांनी मार्केटिंगसोबतच सेंद्रीय अन्न उत्पादनांवर प्रक्रिया करून, देशभरातील रेशन स्टोअर्सपर्यंत उत्पादन पोहचविले व अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यास ते सक्षम बनले. ➡️ प्रतिभा ताई म्हणाल्या “शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या भेडसावत आहे ती म्हणजे बाजारातील किंमत. म्हणून आम्ही ‘भुमिषा ऑरगॅनिक्स’ची सुरुवात केली आहे. याचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना प्रामुख्याने बाजारापेठेत त्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळावी हा आहे. भूमिशा ऑरगॅनिक्सशी संबंधित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती पद्धतीच्या प्रशिक्षणापासून ते त्यांच्या उत्पादनांच्या मार्केटिंगपर्यंत सर्व प्रक्रियांमध्ये सहाय्य मिळते. ➡️ आज संस्थेने केवळ मध्य प्रदेशच नाही तर राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत केली आहे. हा उपक्रम छोट्या प्रमाणावर उभारण्यात आला असताना, भूमिशा ऑरगॅनिक्सची वार्षिक उलाढाल 50 लाखांपेक्षा जास्त आहे. संदर्भ:-the Better india हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
1