AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
५ महिने मोफत अन्नधान्य मिळेल,त्वरित करा ‘हे’ काम !
समाचारAgrostar
५ महिने मोफत अन्नधान्य मिळेल,त्वरित करा ‘हे’ काम !
➡️सरकारद्वार सप्टेंबर २०२२ पर्यंत गरीब व मध्यम वर्गातील कुटुंबांना मोफत अन्नधान्य दिले जात आहे. याचा फायदा घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड व रेशन कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. करोना व्हायरस महामारीनंतर आता जवळपास २ वर्षांनंतर सर्वसामान्यांचे आयुष्य पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. या काळात नोकरदारवर्ग, सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. अनेकांना आपल्या नोकऱ्या देखील गमवाव्या लागल्या. या कालात सरकारकडून गरीब व मध्यम वर्गाला मोफत अन्न-धान्य दिले जात आहे. याचा फायदा सप्टेंबर २०२२ पर्यंत घेता येईल. मात्र, अनेकांकडे रेशन कार्ड असून देखील या योजनेचा फायदा घेता येत नाहीये. याचे कारण म्हणजे अद्याप त्यांनी आधार नंबरला रेशन कार्डशी लिंक केलेले नाही. तुम्ही देखील अद्याप रेशन कार्ड (Ration Card) आणि आधारला लिंक केले नसल्यास त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करा. तुम्ही आधार-रेशन कार्ड घरबसल्या लिंक करू शकता. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया. ➡️असे लिंक करा आधार रेशन कार्ड : 👉आधार रेशन कार्ड लिंक करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जा. 👉येथे 'Start Now' वर क्लिक करा. 👉येथे तुम्हाला तुमच्या राज्याची व जिल्ह्याची माहिती द्यायची आहे. 👉पुढे 'Ration Card Benefit' च्या पर्यायावर क्लिक करा. 👉त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर, ई-मेल आणि मोबाइल नंबर इत्यादीची माहिती द्या. 👉आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. 👉ओटीपी भरल्यानंतर स्क्रीनवर प्रोसेस पूर्ण झाल्याचा मेसेज येईल. 👉ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे आधार व्हेरिफाय होईल व रेशन कार्डशी लिंक झालेले असेल.Aadhaar-Ration Card ला ऑफलाइन करता येईल लिंक ➡️तुम्ही आधार रेशन कार्ड ला ऑफलाइन देखील लिंक करू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार कार्डची कॉपी आणि एक पासपोर्ट साइज फोटो हवा. या कागदपत्रांना घेऊन रेशनच्या दुकानावर जा व फॉर्म भरून द्या. त्यानंतर तुमची बायोमेट्रिक माहिती घेतली जाईळ. अशाप्रकारे, तुमचे रेशन कार्ड हे आधार कार्डला लिंक झाले असेल. याबाबतची माहिती तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर देखील मिळेल. दरम्यान, आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक असल्यास तुम्ही सरकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकता. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
6
इतर लेख