AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्र राज्यात बरसणार पावसाच्या सरी!
हवामान अपडेटAgrostar
महाराष्ट्र राज्यात बरसणार पावसाच्या सरी!
➡️सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. ➡️पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. ➡️हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार काही दिवस राज्यात कोरडे वातावरण राहील. तर विदर्भामध्ये पुढील दोन ते तीन दिवस तापमानाचा पारा 38 ते 39 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. तर 14 ते 16 मार्च दरम्यान विदर्भात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे, आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. ➡️गेल्या चार दिवसापासून राज्यातील वातावरणात खूप बदल झाला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी सकाळच्या वेळी थंड वातावरण आणि दुपारच्या वेळी ऊन तापू लागले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट जनसामान्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. ➡️संदर्भ:Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
7
इतर लेख