AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
महाराष्ट्रात जमीन खरेदी- विक्रीच्या  व्यवहारात अशी होतेय फसवणूक ;काय काळजी घ्याल ?
समाचारAgrostar
महाराष्ट्रात जमीन खरेदी- विक्रीच्या व्यवहारात अशी होतेय फसवणूक ;काय काळजी घ्याल ?
नमस्कार शेतकरी मित्रानो, आपणाला माहित असेलच सध्या जमीन खरेदी करताना फसवणुकीचे खूप सारे दवे समोर येत आहेत. त्यामुळेच आज आपण जाणून घेऊयात जमीनिच्या व्यवहारामध्ये नक्की कश्या प्रकारे फसवणूक होते आणि ते टाळण्यासाठी आपणाला कोणती काळजी घेतली पाहिजे. ➡️१. बोगस कागदपत्रे, व्यक्ती अनेकदा जमीन खरेदी विक्री करताना बोगस कागदपत्रे सादर केली जातात. हे टाळण्यासाठी. "जमीन खरेदी करताना अपडेटेड ऑनलाईन सरकारी कागदपत्रासोबत कागदपत्राची तुलना केली पाहिजे, व्यवहार करताना आधार, पॅनकार्ड या कागदपत्रांची देखील खात्री केली पाहिजे ➡️२. एकच जमीन दोन, तीन जणांना विकणे असे प्रकार खुप वेळा दिसून येतात, तुम्ही जमीन खरेदी केल्यानंतर सुरुवातीला त्याचे खरेदीखत रजिस्टर केले जाते नंतर सातबारावर नोंद केली जाते यासाठी दोन तीन महिने सहज जातात या कालावधीत जमिनीचा मूळ मालक दुस-या ग्राहकाला रजिस्टर खरेदीखत वापरून पुन्हा जमीन विकू शकतो. प्रकरण कोर्टात गेला की रजिस्टर खरेदी खताची पहिली तारीख ज्याची तो त्या जमिनीचा नवा मालक ठरतो म्हणजे पहिलं खरेदीखत कायदेशीर ठरतं त्यामुळे पुढच्या दोन ते तीन व्यक्तींची फसवणूक होते। मात्र तंत्रज्ञानामुळे त्यामुळे खरेदीखत रजिस्टर झाल्यावर एक किंवा दोन दिवसात ऑनलाईन सातबारावरती वरच्या बाजूला डावीकडे फेरफार प्रलंबित नंबर लाल अक्षरांमध्ये दिसतो. ➡️३. गहाण जमिनीची विक्री जमीनीचा मूळ मालक आपली जमीन गहाण ठेवून बँकेकडून कर्ज काढू शकतो. या कर्जाची सातबाऱ्यावर नोंद होण्यापूर्वी जर त्यांन जमिनीची विक्री केली तर ग्राहकाची फसवणूक होते हे उघड आहे. ही फसवणूक तलाठ्याकडे सातबा-याची नोंद करायला गेल्यानंतरच लक्षात येते. त्यासाठी जमिनीच्या मालकाची त्या गावातील विश्वासू व्यक्तींकडे चौकशी करावी संशयास्पद वाटलं तर बँकेतही चौकशी करावी म्हणजे तुमची मोठी फसवणूक टळू शकते. ➡️४. वारसांची हरकत जमिनीचा मूळ मालक जिवंत नसेल तर सातबान्यावर वारस म्हणून त्याच्या मुलाचं नाव तुम्ही पाहता पण या वारसांमध्ये मुलींची नाव जोडली नसतील किंवा इतर व्यक्तींची नाव नसतील आणि त्याबद्दल तुम्ही चौकशी केलेली नसेल तर ही जमीन खरेदी करून तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. एकदा जमीन खरेदी केल्यानंतर त्या जमिनीच्या कुळांनी किंवा वारसांनी आपल्या हक्काचा दावा लावला तर ही केस कोर्टामध्ये बरीच वर्ष चालू राहते त्यामुळे जिथे जमीन खरेदी करणार आहात तिथल्या गावांमध्ये नीट चौकश करा मगच जमीनीचा व्यवहार पूर्ण करा ➡️५. जमिनीच्या गटाचा नकाशा पाहणे ज्या गटातील शेतजमीन खरेदी करायची आहे, त्या गटाचा नकाशा पाहणं गरजेचं असतं. यामुळे एकतर आपल्याला जमिनीची हद्द कळते. नकाशाप्रमाणे जमिनीची हद्द तपासून घ्यावी. दुसरं म्हणजे चतु सीमा कळते आपण जी जमीन खरेदी करतोय, त्याच्या चारही बाजूंना कोणते गट नंबर आहेत, याची माहिती स्पष्ट होते ➡️६. शेत रस्ता जी जमीन खरेदी करायची आहे. तिथे जाण्यासाठी शेतरस्ता आहे की नाही, ते पाहावे. जमीन बिनशेती असेल तर जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवतेला असतो पण, जमीन बिनशेती नसेल तर व रस्ता खाजगी असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी ➡️जमीन खरेदी करताना फसवणूक झाल्यास तक्रार कुठे करावी ? अशा प्रकरणात फसवणूक झाली असल्यास व्यक्ती आपल्या अर्जासह जमिनीचे कागदपत्रे तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन तक्रार नोंदवू शकतात या कागदपत्रांच्या आधारे त्याचा पुढीत तपास करता येतो. याशिवाय जर आर्थिक फसवणूक असेल तर त्याची पोलिसात तक्रार करता येते. पोलीस त्याबाबतची पुढील कारवाई करतील ➡️ संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
3
इतर लेख