AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा पीक लागवडीचे करा योग्य नियोजन !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा पीक लागवडीचे करा योग्य नियोजन !
🥔खरिफ आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात बटाटा पिकाची लागवड केली जाते. रब्बी हंगामातील बटाटा लागवडीचे नियोजन सप्टेंबर महिन्यापासून केले जाते. बटाट्याच्या योग्य वाढीसाठी 22 ते 24 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. लागवडीसाठी एकरी 500 ते 600 किलो बेणे वापरावे. 🥔जमिनीमध्ये पाणी साचून राहत असल्यास बटाटा विकासाच्या काळात फळ सड होऊ शकते त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होणारी व भुसभुशीत, पोयट्याची जमीन लागवडीसाठी निवडावी. योग्य वाढ व विकास होण्यासाठी लागवड ही गादी वाफ्यावर करावी. सरी वरंबा पद्धतीचा वापरही केला जातो. दोन ओळींमधील अंतर दोन फूट तर झाडांमधील अंतर जमिनीचा पोत व जातिनुसार 30 सेंमी किंवा 45 सेंमी ठेवावे. 🥔संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
3