AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोस्ट ऑफिसच्या या योजनेने भविष्य बनवा उज्वल!
योजना व अनुदानLokmat News
पोस्ट ऑफिसच्या या योजनेने भविष्य बनवा उज्वल!
नवी दिल्ली : सध्याच्या कोरोना परिस्थितीत काळात सर्वांनाच बचतीचं महत्त्व पटलं आहे. छोट्या बचतीची एक पोस्टाची योजना आहे, ज्यात मोठी रक्कम जमा करता येते. पोस्टाच्या या जबरदस्त योजनेचे नाव आहे- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना. या योजनेव्दारे तुम्ही दररोज 150 रुपयांची बचत करून, तुम्हाला 20 वर्षांनंतर 20 लाख रुपयांहून अधिकचा फंड मिळू शकतो. यासाठी तुम्हाला दररोज 150 रुपयांची बचत करणे आवश्यक आहे. जर आता तुमचं वय 25 वर्षं असेल तर तुम्हाला छोटीशी गुंतवणूक करून मोठी रक्कम कमवण्याची सर्वोत्तम संधी उपलब्ध आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, जर तुमचा मासिक पगार 30 ते 35 हजार रुपये असेल तर सुरुवातीच्या काळात 100 ते 150 रुपयांची दररोजची बचत करता येऊ शकते. ही छोटीशी बचत तुम्हाला 45 व्या वर्षापर्यंत 20 लाख रुपयांचा फंड मिळवून देईल. जेणेकरून नोकरी करता करता तुम्ही तुमच्या इतर गरजा सहजपणे पूर्ण करू शकता. संदर्भ:- Lokmat News. 👉🏻हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
54
8
इतर लेख