AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पी.एम.किसान चे पैसे न मिळण्याचे कारण घ्या जाणून !
कृषी वार्ताAgrostar
पी.एम.किसान चे पैसे न मिळण्याचे कारण घ्या जाणून !
➡️केंद्र सरकारकडून गेल्या ४ वर्षांपासून शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला ६००० हजार रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ हफ्त्यांचे पैसे जमा झाले आहेत. मात्र १२ हफ्ता येण्याच्या वेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ➡️देशातील ११ कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र यामध्ये अनेक अपात्र शेतकरी आहेत तेही या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या नियमावलीत मोठा बदल केला आहे. १. ई-केवायसी अनिवार्य : केंद्र सरकारने अपात्र शेतकऱ्यांना आळा घालण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या १२ व्या हफ्त्याचे पैसे लांबणीवर पडले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले असेल त्याच शेतकऱ्यांना पुढील हफ्त्याचे पैसे मिळणार आहेत. २. सातबाऱ्यावर नाव गरजेचे : अनेक शेतकरी असे आहेत ते भाडेतत्वावर जमीन घेऊन शेती करत आहेत. असेही शेतकरी सरकारच्या योजनेचा लाभ घेत आहे. अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच वडिलोपार्जित शेती करत असाल आणि तुमचे नाव सातबाऱ्यावर नसेल तरीही तुमहाला योजनेचा लाभ मिळणार नाही. ३. बॅंक खातेही महत्वाचे : तुम्ही पीएम योजनेसाठी कोणते बँक खाते दिले आहे हे देखील महत्वाचे आहे. कारण दिलेला तपशील आणि जमा होणाऱ्या खात्यामध्ये समानता नसेल तरीही तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला योजनेसाठी कोणते खाते दिले आहे हे पाहणे गरजेचे आहे. ४. अर्जावरील माहिती महत्वाची : पीएम किसान योजनेच्या लाभासाठी तुम्ही जो अर्ज केला आहे, त्यामध्ये सर्व माहिती ही अचूक असणे गरजेचे आहे. आधार कार्डवरील नावातील स्पेलिंग किंवा जन्म तारिख ही जर का चुकीची असेल तरीही तुम्हाला निधी हा लागलीच मिळणार नाही. त्यानंतर योग्य त्या कागदपत्रांचाच पुरवठा करावा लागणार आहे. ५. उत्पन्न : सर्वकाही अवलंबून जर तुमचे मासिक उत्पन्न हे 10 हजाराहून अधिक असेल किंवा यापेक्षा अधिकची पेन्शन तुम्हाला मिळत असेल तर मात्र, योजनेचा लाभ घेता येणार नाही. आतापर्यंत असे असतानाही योजनेचा लाभ घेतला असेल तर मात्र, हे पैसे परत करावे लागणार आहेत. आतापर्यंत कोट्यावधी रुपये सरकारने वसुल केले आहेत. ➡️संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
11
इतर लेख