AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकात रासायनिक तणनाशकांचा वापर करताना घ्यावयाची काळजी!
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
पिकात रासायनिक तणनाशकांचा वापर करताना घ्यावयाची काळजी!
➡️बहुतेकदा तणांमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी तसेच मजुरांचा अभाव, वेळेची बचत या सगळ्या कारणांमुळे उभ्या पिकात मोठ्या प्रमाणात तणनाशकांचा वापर केला जातो. परंतु तणनाशकांच्या वापराबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे तणांचे नियंत्रण होणे कठीण जाते उलट त्याचा विपरीत परिणाम आपल्या पिकांवर होतो. यासाठी उभ्या पिकात तणनाशकांचा वापर करताना त्याबद्दल पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे ➡️उभ्या पिकात तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी ➡️तणनाशकाची निवड करण्यापूर्वी तणनाशक कुठल्या पिकात वापरणार आहोत त्याचबरोबर पीक व तण उगवणीपूर्वीचे व उगवणीनंतर वापरायचे तणनाशक, निवडक व बिन निवडक प्रकारातील तणनाशक याबद्दल संपूर्ण माहिती घेऊनच तणनाशक खरेदी करावे. ➡️ विविध पिकानुसार पेरणीनंतर/पुनर्लागवडीनंतर 21 ते 30 दिवसांत तणनाशकाचा वापर करावा. ➡️तणांची वाढीची अवस्था 2 ते 5 पानांवर असावी. त्यापेक्षा जास्त मोठे तण असल्यास नियंत्रण मिळणे कठीण जाते ➡️तणनाशक फवारणी करतांना जमिनीत ओल असावी ➡️फवारणी करताना हवा शांत असावी तसेच ढगाळ वातावरणात फवारणी करू नये ➡️पाऊस न येण्याची शक्यता (किमान 2 ते 4 तास) लक्षात घेऊनच फवारणी करावी. ➡️तणनाशक फवारणी साठी स्वतंत्र नॅपसॅक पंप असावा तसेच फ्लॅट पॅन अथवा फ्लड जेट नोझल चा वापर करावा ➡️फवारणीसाठी वापरण्याचे पाणी स्वच्छ असावे ➡️फवारणीसाठी जमिनीवर व्यवस्थित फवारा बसण्यासाठी प्रति एकर 150 - 200 लिटर पाणी वापरावे ➡️शिफारस केलेली तणनाशके संबंधित पिकासाठी, दिलेल्या मात्रेमध्ये, दिलेल्या वेळी आणि दिलेल्या पद्धतीने वापरावीत. ➡️फवारणी करताना संरक्षित किट चा वापर करावा ➡️आंतरपीक असताना पिकात तणनाशकांचा वापर करणे टाळावे. ➡️पीक व तण उगवणीपूर्वीचे तणनाशक वापरणार असल्यास पीक पेरणीनंतर तातडीने 24 तासांत कोरड्या जमिनीवर फवारणी करावी व त्यानंतर पिकास पाणी द्यावे. ➡️उगवणीपूर्वीचे तणनाशक वापरण्यापूर्वी जमिनीत ओल अथवा पाऊस झालेला नसावा. फवारणी करताना उलट दिशेने चालणे गरजेचे आहे. वरील संपूर्ण माहिती लक्षात घेऊन त्यापद्धतीने त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होईल संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
1