AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पहा, हळद कंदांची विभागणी कशी करावी.
सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
पहा, हळद कंदांची विभागणी कशी करावी.
👉जेठे गड्डे - मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठे गड्डे (मातृकंद) म्हणतात. सदरचे गड्डे प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी वापरतात. त्यामुळे काढणीनंतर हे गड्डे ताबडतोब सावलीमध्ये ठेवावेत. 👉सोरा गड्डा - लागवडीसाठी वापरलेले कंद ५० ते ६० टक्के कुजून जातात. राहिलेले ४० ते ५० टक्के कंदांना सोरा गड्डे म्हणतात. हे काळपट रंगाचे मुळ्याविरहीत असतात. यांना हळकुंडापेक्षा दुप्पट भाव मिळतो. 👉बगल गड्डे - जेठे गड्ड्याला आलेल्या फुटव्यांच्या खाली बगल गड्डे तयार होतात, त्यास अंगठा गड्डे असेही म्हणतात. ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बियाणे म्हणून करतात. 👉हळकुंडे - बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात. प्रामुख्याने प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी याचा वापर करतात. यातील काही हळकुंडांना उपहळकुंडे येतात. त्यास लेकुरवाळे हळकुंडे असे म्हणतात. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
5
इतर लेख