AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पर्सनल लोनवर SBI देतंय खास सूट!
समाचारन्युज १८ लोकमत
पर्सनल लोनवर SBI देतंय खास सूट!
➡️स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या ग्राहकांसाठी वैयक्तिक कर्जावर विशेष सवलत दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की ग्राहकांना झिरो प्रोसेसिंग फीवर कर्ज देईल. ३१ जानेवारी २०२२ पूर्वी घेतलेल्या वैयक्तिक कर्जांवर झिरो प्रोसेसिंग फी लागू होईल. ➡️तुम्ही एसबीआयच्या वैयक्तिक कर्जासाठी कधीही अप्लाय करू शकता. अगदी रात्री उशिरा देखील घरबसल्या या कर्जासाठी तुम्हाला अर्ज करता येईल. योनो अॅपवर अवघ्या काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही कर्ज मिळवू शकता. ➡️दरम्यान सर्वांनाच हे लोन मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज मिळवण्याच्या पात्रतेत बसणाऱ्यांनाच हे कर्ज मिळेल. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइट-sbi.co.in ला भेट देऊ शकता ➡️सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी कर्जदार असणाऱ्या या बँकेने अलीकडेच या ऑफरबद्दल ट्वीट केले होते.बँकेने म्हटले आहे की कमी व्याज दर, शून्य प्रक्रिया शुल्क या सुविधांसह आम्ही तुम्हाला योग्य निवडण्यात मदत करतो. SBI वैयक्तिक कर्जासाठी, ग्राहकांना ९.६० टक्के वार्षिक दराने व्याज द्यावे लागेल. ३१ जानेवारी २०२२ पूर्वी कर्ज घेतले असेल तरच झिरो प्रोसेसिंग फी लागू होईल. ➡️कशाप्रकारे मिळवाल लोन?- हे लोन मिळवण्यासाठी तुमच्याकडे योनो अँप असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे योनो आणि तुम्ही कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहात तर केवळ चार स्टेप्सच्या माध्यमातून तुम्ही कर्ज मिळवू शकता. काय आहेत या चार स्टेप्स- १ १.सर्वात आधी तुम्हाला योनो अँप मध्ये लॉग इन करायचे आहे, २. यानंतर तुम्हाला ‘Avail Now’ वर क्लिक करायाचे आहे, ३. याठिकाणी कालावधी आणि रक्कम (अमाउंट) प्रविष्ट करा, ४. यानंतर तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा. ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर कर्जाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा होईल लोन मिळेल की नाही कसे तपासाल? जर तुम्हाला पाहायचे आहे की तुम्हाला लोन मिळेल की नाही तर तुम्ही ५६७६७६ या क्रमांकावर एसएमएस करून माहिती मिळवू शकता. तुम्हाला एसएमएसमध्ये <PAPL> <space> <SBI account चे शेवटच चार डिजिट्स> लिहून ५६७६७६ या क्रमांकावर पाठवायचे आहेत. संदर्भ:- न्युज १८ लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
34
11