AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
देशातील पहिली हायब्रिड स्कूटर लाँच!
ऑटोमोबाईललोकमत
देशातील पहिली हायब्रिड स्कूटर लाँच!
➡️ लेटेस्ट अपडेटबरोबरच अनेक बदल या स्कूटरमध्ये पहायला मिळतात. नव्या स्कूटरमध्ये नवीन लुक देण्यात आली आहे. तसेच नवीन रंगात ही उपलब्ध करण्यात आलीआहे. ➡️ जपानची मुख्य वाहन निर्माता कंपनी Yamaha ने देशातील पहिली हायब्रिड स्कूटर Yamaha Fascino 125 FI Hybrid लाँच केली आहे. ➡️Yamaha फासचिनो 125 FI ही डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक अशा दोन स्वरुपात येते. डिस्क ब्रेक स्कूटरची एक्सशोरुम किंमत 76,530 रुपये ठेवण्यात आली आहे. तर ड्रम ब्रेक व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 70,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ➡️लेटेस्ट अपडेटबरोबरच अनेक बदल या स्कूटरमध्ये पहायला मिळतात. नव्या स्कूटरमध्ये नवीन लुक देण्यात आली आहे. तसेच नवीन रंगात ही उपलब्ध करण्यात आलीआहे. ➡️नव्या Fascino 125 FI हायब्रिड स्कूटरमध्ये स्मार्ट मोटर जनरेटर (SMG) सिस्टिम मिळते. एसएमजी एका इलेक्ट्रीक मोटरसारखे काम करते. ➡️स्कूटर उभी असताना पुढे जाण्यासाठी वेग पकडण्यासाठी ही सिस्टिम इंजिनला मदत करते. यामहानुसार ही प्रणाली टेंडेम रायडिंग मध्ये किंवा चढाच्या सुरुवातीला अॅक्सलरेशनवेळी स्कूटरचे डगमगने कमी करण्याचे काम करते. ➡️Fascino 125 ला ताकद देण्यासाठी कंपनीने हायब्रिड टेक्नॉलॉजीसह एक रिफ्रेश इंजिन दिले आहे. हे इंजिन 8.6 bhp ची ताकद आणि 10.3Nm पीक टॉर्क निर्माण करते. स्कूटरच्या आधीच्या मॉडेलमध्ये इंजिन 8.4 bhp ताकद आणि 9.7 Nm पीक टॉर्क निर्माण होत होते. यामध्ये एक सायलंट स्टार्टर देखील मिळतो. ➡️हे तंत्रज्ञान सायलंट इंजिन इग्निशनला मदत करते. म्हणजेच आवाज न करता इंजिन सुरु होते. हे फीचर भारतात काही 125 सीसीच्या स्कूटरमध्ये मिळते. ➡️नव्या 2021 Fascino 125 मध्ये अन्य फीचर्समध्ये देखील बदल झालेले आहेत. स्कूटरच्या हायर-स्पेक डिस्क ब्रेक वर्जनमध्ये ब्ल्यूटूथ सोबत Connect X app सह महत्वाचे फीचर देणयात आले आहेत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
3