AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
१३ ते १९ जूनपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
१३ ते १९ जूनपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
➡️ महाराष्ट्रावर रविवार (उद्या) दि. १३ पासून ते १९ जून पर्यंत हवेचा दाब १००० ते १००२ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल परिणामी कोकण व विदर्भात अतिवृष्टीची शक्यता आहे. ➡️ दिनांक १५ जून रोजी ते १८ जून पर्यंत उत्तर महाराष्ट्राचे तसेच महाराष्ट्राचे विदर्भ भागावर तसेच मुंबई सह उत्तर कोकणावर ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे अतिवृष्टी व मुसळधार पावसाची शक्यता आहे. ➡️ हवामान बदलाचाच हा परिणाम असून अनेक वर्षानंतर पहिल्यांदा पुन्हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. ➡️ सर्व हवामानाचा अंदाज पाहता पुणे व कोल्हापूर या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ➡️ मुसळधार पाऊस, चक्रीवादळ, वीज कोसळणे, गारपीठ होणे, समुद्राकडेच्या वस्त्यांचे जवळील समुद्राचे पाणी पाणी वाढणे यामुळे सर्वत्र हवामानाची आणीबाणी निर्माण होत आहे यामुळे समुद्र किनाऱ्यावरील मुंबई शहराच्या वस्त्यांना हि धोका आहे. ➡️ मित्रांनो, वरील हवामान अंदाजानुसार आपण आपली काळजी व आपल्या पिकांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. संदर्भ - डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ) हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
143
54
इतर लेख