AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तालुका स्तरावर पीकविमा कार्यालये!
कृषी वार्ताAgrostar
तालुका स्तरावर पीकविमा कार्यालये!
➡️मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 2 लाख 19 हजार 105 हेक्टरवरील 4 लाख 61 हजार 407 शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ➡️त्याचवेळी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी शेतकन्यांना योग्य वागणूक देत नसल्याच्या तक्रारी होत्या. या सर्व समस्यांमुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विमा कंपनीचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश दिले. त्यानंतर, त्यानुसार प्रत्येक तालुकास्तरावर पीक विमा कंपन्यांची कार्यालये तातडीने सुरू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. ➡️कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्यात जिंतूर तालुक्यातील पीक विमा कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर जिल्ह्यातील पीक विमा कंपनीची सर्व कार्यालये बंद असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पीक विमा कंपनीचे कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. आणि पीक संबधित कामगार शेतकऱ्यांचे फोन उचलत नाहीत. शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेटही घेतली नाही. आणि शेतकऱ्यांच्या विम्याच्या तक्रारी तत्काळ दूर झाल्या नाहीत. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्र्यांनी बैठकीत उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. ➡️सत्तार यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने पीक विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नायब तहसीलदार यांचे संपर्क क्रमांक पीक विमा कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी जाहीर केले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना होणार आहे. पीकविषयक तक्रारी आता तालुकास्तरावर मांडता येणार आहेत. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
5
इतर लेख