AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तरुणांसाठी योजना! बेरोजगार तरुणांना केंद्र सरकारची मदत !
योजना व अनुदानAgrostar
तरुणांसाठी योजना! बेरोजगार तरुणांना केंद्र सरकारची मदत !
➡️केंद्र सरकारच्या समाजातील विविध घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना आहेत. आता बेरोजगारांचा प्रश्न किती गंभीर स्वरूप धारण करून आहे हे आपल्याला माहिती आहे.अशा तरुणांसाठी देखील त्यांना उद्योग व्यवसायात जम बसवता यावा यासाठी विविध प्रकारच्या योजना आहेत. अशीच एक महत्त्वपूर्ण योजना जी बेरोजगार तरुणांना फायदेशीर ठरते. ➡️पंतप्रधान रोजगार योजना : ही योजना बेरोजगारांसाठी खूप महत्वपूर्ण असून या योजनेच्या माध्यमातून ज्या तरुणांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना बँकांच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज दिले जाणार आहे. व्यवसाय करण्यासाठी जर तुमच्याकडे भांडवलाची कमतरता असेल तर तुम्ही प्रधानमंत्री योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. वास्तविक ही योजना सन 2020 मध्ये जाहीर करण्यात आली. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना 22.5 टक्के तर इतर मागास प्रवर्गाला 27 टक्के आरक्षण दिले जाते. ➡️ही योजना संपूर्ण देशात लागू असून देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल बेरोजगार तरूण व ज्यांचे संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सर्व उत्पन्नाच्या स्त्रोतांच्या माध्यमातून 40 हजार रुपये आहे असे तरुण पीएमआरवाय 2021 अंतर्गत अर्ज करू शकता. एवढेच नाही तर संबंधित व्यवसायाचे दहा ते पंधरा दिवसांचे फ्री प्रशिक्षण देखील या तरुणांना दिले जाते. या योजनेत महिलावर्ग तसेच ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमाती इत्यादींना आरक्षण देण्यात आले आहे. ➡️या योजनेसाठीच्या पात्रता : 1- यामध्ये अर्जदाराचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 35 वर्ष असणे आवश्यक आहे. 2- अर्जदार हा कमीत कमी आठवी पास असणे गरजेचे आहे. 3- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 49 हजार पेक्षा जास्त नसावे. 4- लाभार्थीचे कायमस्वरूपी राहत असलेले निवास किमान तीन वर्षाचे असणे आवश्यक आहे. 5- सगळ्यात महत्वाचे म्हणजे लाभार्थी हा कोणत्याही प्रकारच्या राष्ट्रीयीकृत वित्तीय संस्था किंवा बँक, कोणत्याही सहकारी बँकेचे कर्ज थकबाकीदार अर्थात डिफॉल्टर असू नये. 6-प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी सुरू केलेल्या रोजगाराची किंवा व्यवसायाची एकूण किंमत दोन लाखापर्यंत असावी व जे तरूण त्यांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीमुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम नाहीत त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. ➡️योजनेचा व्याजदर : जर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून खर्च केला तर तुम्हाला 25000 कर्जावर बारा टक्के व्याज लागते व त्यासोबतच पंचवीस हजार रुपये ते एक लाखाच्या कर्जावर 15.5 टक्के व्याज द्यावे लागते. म्हणजे आपण एकंदरीत विचार केला तर कर्जाची रक्कम जर वाढली तर व्याजाचे दरही वाढतात. ➡️संदर्भ: Agrosatr हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
3
इतर लेख