AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ड्रोन खरेदीसाठी सरकारची मदत!
योजना व अनुदानAgrostar
ड्रोन खरेदीसाठी सरकारची मदत!
➡️शेतीमध्ये ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त ४ लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. त्यामुळे अल्प आणि लघू भूधारक शेतकरीही ड्रोनचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी सक्षम होणार आहेत. अशा छोट्या शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मशीनरी खरेदी करणे परवडणारे नाही. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. ➡️शेतकरी, एफपीओ आणि ग्रामीण उद्योगांना कस्टम हायरिंग सेंटरद्वारे ड्रोनच्या मूळ खर्चापैकी ४० टक्के अथवा जास्तीत जास्त ४ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जात आहे. पिकांमधील कीड, रोग रोखण्यासाठी त्यावर स्प्रेद्वारे फवारणी करावी लागते. ड्रोन तंत्राद्वारे एकाच वेळी खूप मोठ्या क्षेत्रात फवारणी करता येते. त्यामुळे औषध आणि वेळ या दोन्ही गोष्टींची बचत करता येते. शेतकऱ्यांच्या शेती करण्याच्या खर्चातही चांगलीच कपात होऊ शकेल. पिकावर वेळीच औषध फवारणी आणि ड्रोनच्या माध्यमातून त्यावर नियंत्रणे ठेवणे फायदेशीर ठरणार आहे. तरच पिकांवरील रोगांना रोखता येईल. ➡️केंद्र सरकारच्या पुढाकारानंतर ड्रोनच्या प्रशिक्षणासाठी केंद्रेही उघडण्यात आली आहेत. हरियाणातील तीन, महाराष्ट्रातील चार , तेलंगणातील दोन, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, गुजरातमधील अहमदाबाद, हिमाचल प्रदेशातील शाहपूर, झारखंडमधील जमशेदपूर, कर्नाटकातील बेंगळुरू आणि तामिळनाडूमधील चेन्नई येथे प्रशिक्षण शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
4
इतर लेख