AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ट्रॅक्टर खरेदीसाठी ५०% सबसिडी!
योजना व अनुदानAgrostar
ट्रॅक्टर खरेदीसाठी ५०% सबसिडी!
🚜शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने भारत सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होत आहे. शेती उपकरणे ट्रॅक्टरवरही सरकार योजना राबवत आहे. ज्याचे नाव आहे पीएम किसान ट्रॅक्टर योजना, ज्यामध्ये शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान दिले जात आहे. 🚜पीएम किसान ट्रॅक्टर योजना:- प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना शेतीकडे प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने चालवली जाणारी योजना आहे. ही योजना २०२२ मध्येच सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50 टक्के अनुदान सरकारकडून दिले जाते. 🚜किसान ट्रॅक्टर अनुदान योजनेची पात्रता:- 👉🏻पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याने भारतीय रहिवासी असणे अनिवार्य आहे. 👉🏻शेतकऱ्याकडे शेतीसाठी वैध शेतजमीन असली पाहिजे. 👉🏻अर्जदार शेतकऱ्याचे भारतातील कोणत्याही बँकेत खाते असले पाहिजे, तसेच त्याचे खाते आधारशी लिंक केलेले असावे. 👉🏻शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा जास्त नसावे. 🚜किसान ट्रॅक्टर अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे:- 👉🏻शेतकऱ्याची जमीन कागदपत्रे (७ /१२ व ८ अ ) 👉🏻 शेतकऱ्याचे आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, ओळखपत्र 👉🏻पासपोर्ट आकाराचा फोटो 👉🏻जमिनीशी संबंधित कागदपत्रे 🚜संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
144
10
इतर लेख