AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो फळांची तोडणी!
गुरु ज्ञानतुषार भट
टोमॅटो फळांची तोडणी!
🍅टोमॅटो लागवडीनंतर साधारणत - 60 ते 75 दिवसांनी वाणांनुसार फळे काढणीस तयार होतात. टोमॅटोची फळे पिकताना फळांचा हिरवा रंग हळूहळू कमी होऊन त्यावर गुलाबी छटा येण्यास सुरुवात होते. फळे शेंड्याकडून देठाकडे पक्व होत जातात आणि त्यांचा रंग जातीप्रमाणे लाल, गुलाबी किंवा नारंगी होतो. 🍅लांबच्या बाजारपेठेसाठी डोळा पडण्यास सुरुवात झालेली म्हणजे पिवळा ठिपका पडलेली फळे तोडावीत. जवळच्या बाजारपेठेसाठी गुलाबी रंगाची आणि स्थानिक बाजारासाठी किंवा प्रक्रियेसाठी लाल रंगाची पक्व फळे तोडावीत. फळे काढणीपूर्वी 4 ते 5 दिवस रासायनिक औषधांची फवारणी करणे टाळावे. 🍅संदर्भ:- तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0
इतर लेख