AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकाच्या लागवडीविषयी महत्वाची माहिती!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
टोमॅटो पिकाच्या लागवडीविषयी महत्वाची माहिती!
➡️टोमॅटो पिकाला वर्षभर मागणी असते तसेच संकरित जाती विकसित झाल्यामुळे टोमॅटो पिकाचे वर्षभर उत्पादन घेणे शक्य होते. ➡️ज्या जमिनीत पूर्वी मिरची, वांगी, टोमॅटो, बटाटा भेंडी आणि इतर वेलवर्गीय पीक घेतलेल्या जमिनीत टोमॅटो लागवड करणे टाळावे. ➡️चांगला पाण्याचा निचरा होण्याऱ्या मध्यम ते भारी कसदार जमिनीत टोमॅटो पिकाची लागवड करावी. सुरुवातीला जमिनीची चांगली मशागत करून आधीच्या पिकांचे अवशेष नष्ट करावेत. ➡️आधुनिक पद्धतीने लागवड करावयची असल्यास 2 ते 3 फूट रुंद 1 फूट उंच गादीवाफा तयार करून त्यामध्ये मुबलक खतांची मात्रा द्यावी. त्यानंतर ठिबक आणि मल्चिंग टाकावे. दोन ओळींमधील अंतर 4 फूट असल्याने लागवडीसाठी दोन रोपांमधील अंतर 1.5 फूट ठेवावे. ➡️लागवडीसाठी 25 दिवसांच्या वयाची 12 ते 15 सेंमी उंचीची निरोगी रोपे निवडावी. ज्या रोपाच्या खोडात जांभळा रंग विकसित झालेला असेल असे निरोगी रोप लागवडीसाठी वापरावे. रोपांची लागवड करताना मुळांना धक्का लागणार नाही अथवा खोडावर दाब बसणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा खोड पिचकले गेल्यामुळे रोपे खराब होऊन मर लागते. लागवडीनंतर पिकास त्वरित पाणी द्यावे. ➡️पुढे 3 ते 4 दिवसांत पिकाच्या वाढीसाठी आणि फुटव्यांसाठी विद्राव्ये खत सोडायला सुरुवात करावी. तसेच पिकात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी आणि टाळण्यासाठी पिवळ्या आणि निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. ➡️लागवडीनंतर 8 ते 10 दिवसांत रोप जमिनीत स्थिर झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात येणारे कीड व रोग नियंत्रणासाठी शटर कीटकनाशक 100 ग्रॅम आणि मँडोझ बुरशीनाशक 500 ग्रॅम सोबतच सफेद मुळीचा विकास होण्यासाठी ह्युमिक 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर आळवणी करावी. तयार केलेले द्रावण रोपाच्या खोडापासून 2 ते 3 इंच अंतर सोडून रिंगण पद्धतीने आळवणी करावी. द्रावण रोपावर उडणार नाही याची काळजी घ्यावी. ➡️टोमॅटो पिकास सुपारीच्या आकारा एवढी फळधारणा झाल्यावर पिकास आधार देणे गरजेचे आहे. संकरित जातींपासून टोमॅटो पिकाच्या जास्त उत्पादनासाठी सगळयात महत्वाचा भाग म्हणजे अन्नद्रव्ये व्यवस्थापन. टोमॅटो पिकास संपूर्ण अन्नद्रव्येमध्ये 39 % पोटाश, 25 % कॅल्शिअम, 25 % नायट्रोजन खालोखाल 7 % फॉस्फोरस आणि 7 % मॅग्नेशिअम ची आवश्यक्यता आहे. इतरअन्नद्रव्यांच्या तुलनेत पोटॅश, नायट्रोजन आणि कॅल्शिअम या अन्नद्रव्याची पिकास गरज जास्त लागते. ➡️सुरुवातीला मल्चिंग टाकण्यापूर्वी जमीनीत निंबोळी पेंड, डीएपी, पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर करावा. पीक वाढीच्या अवस्थेत मुख्य अन्नद्रव्ये असलेले विद्राव्ये खतांसोबतच पिकास कॅल्शिअम नायट्र्रेट, मॅग्नेशिअम सल्फेट यांचा वापर करावा. फुलांच्या आणि फळांच्या अवस्थेत पिकास कॅल्शिअम व बोरॉन वापरावे. ➡️किडींमध्ये नागअळी रसशोषक कीड, फळ पोखरणारी अळी तसेच विषाणूजन्य रोग, करपा, मूळकूज, भुरी, पानांवरील ठिपके यांसारखे रोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक कीड आणि रोग नियंत्रित पद्धतीचा अवलंब करावा. वरील पद्धतीने नियोजन केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
8
इतर लेख