AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जाणून घ्या, महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्व आणि इतिहास !
कृषी वार्ताAgrostar
जाणून घ्या, महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्व आणि इतिहास !
🌱सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवाना अ‍ॅग्रोस्टार परिवारातर्फ महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🌱महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा केला जातो. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून गणले जाते. कारण भारत अनेक उत्पादनांसाठी या महाराष्ट्रावर अवलंबून आहे. ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ, आसमानी आणि सुलतानी संकटामुळे राज्यातील शेतक-यांची अवस्था दयनीय होत असून, दरवर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतो आहे अशा परिस्थितीत मोती, माती आणि शेतकन्याशी संबंधित सगळ्या प्रशांवर तोडगा काढण्यासाठी कृषी दिवस एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतो. 🌱या दिवशी शेतकयांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. त्यासोबतच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकयांचा गौरव केला जातो. 🌱कृषी दिनाचा नेमका इतिहास काय आहे : राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. वसंतराव नाईकांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनकही म्हटले जाते त्यांच्या जन्मदिवस हा महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी झाला. १९६३ ते १९७५ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते जेव्हा पासून वसंत नाईक है महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकयांच्या विकासासाठी सदैव योगदान दिले आहे. 🌱महाराष्ट्रात कृषी दिनाला विशेष महत्त्व आहे. कारण वसंतराव नाईक यांनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बहुमोल सेवा दिती या दिवशी राज्यभरात अनेक उत्सवाचे आयोजन केले जाते. या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांना आणि कृषी क्षेत्राशी संबंधित समस्यांवर बोलण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो. कृषी दिन शेतक-यांच्या दुर्दशेबद्दल मदत आणि जागरुकता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नावर प्रकाश टाकतो. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
3