AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जमीन विकल्यास शेतकऱ्यांना भरावा लागणार 'इतका' टॅक्स!
कृषी वार्ताAgrostar
जमीन विकल्यास शेतकऱ्यांना भरावा लागणार 'इतका' टॅक्स!
➡️शेतकरी आपली शेतजमीन विकण्याचा विचार करत असतात. आयकर कायदा १९६१ नुसार कोणतीही शेतजमीन ही काही तरतुदींची पूर्तता केल्याशिवाय भांडवली मालमत्ता मानली जात नाही. अशा परिस्थितीत तुमची जमीन जर पूर्ण शेतजमीन असेल तर ती विकून मिळणारी रक्कम ही पूर्णपणे आयकरातील तरतुदींच्या बाहेर असेल. ➡️टॅक्स आकारणी : ज्याची लोकसंख्या १० हजारांपेक्षा कमी नाही किंवा नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या २ ते ८ किलोमीटरच्या आत येते, ज्यांची लोकसंख्या १० हजार ते १ लाख या दरम्यान असेल तर अशा शेतजमिनीची विक्री केल्यावर भांडवली नफा कर (tax) भरावा लागेल. तसेच महापालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीत कोणतीही शेतजमीन येत असेल तर अशा शेतजमिनींची विक्री केल्यावर भांडवली नफा कर भरावा लागेल. ➡️टॅक्स कधी आकारला जाणार नाही : शेतजमिनीच्या विक्रीवर कधी टॅक्स (tax) आकारला जाणार नाही आणि त्यावर कधी कर आकारला जाईल, हे प्राप्तिकरातील तरतुदींमध्ये अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी या दोन्ही प्रकरणांबाहेरील जमीन विकल्यास ती कराच्या जाळ्यात येणार नाही. शेतजमीन ही भांडवली मालमत्ता मानली तर ती विकल्यावर तुम्हाला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कर भरावा लागू शकतो. तेही जेव्हा तुम्ही २४ महिन्यांपेक्षा जास्त काळ जमीन आपल्याजवळ ठेवली असेल. ➡️टॅक्स सवलत अशी मिळेल : 👉🏻कलम 54B प्राप्तिकर कायद्याच्या या कलमांतर्गत जर तुम्ही शेतजमीन विकून पैसे कमावले असतील आणि त्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स (tax) भरावा लागला असेल तर दोन वर्षांत दुसरी शेतजमीन खरेदी करून या पैशातून कर भरणे टाळता येईल. दोन वर्षांच्या आत तुम्हाला दुसरी शेतजमीन खरेदी करता येत नसेल, तर कलम १३९ अंतर्गत आयकर विवरणपत्र भरण्यापूर्वी तुम्ही ती रक्कम भांडवली नफा खाते योजनेत जमा करू शकता. यावर तुम्हाला कर सवलतही मिळते. 👉🏻कलम 54EC शेतजमिनीच्या विक्रीतून मिळणारा भांडवली नफा तुम्ही ६ महिन्यांच्या आत रोख्यांमध्ये गुंतवल्यास कर सवलतीचा दावाही करता येतो. अशा प्रकारे एलटीसीजीचा लाभ एका आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांत घेता येईल. 👉🏻कलम 54F महत्वाचे म्हणजे शेतजमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून घर बांधल्यास एलटीसीजी सवलतीचा दावाही करता येतो. ही रक्कम जर तुम्ही ठरलेल्या वेळेत घराच्या बांधकामात गुंतवू शकत नसाल तर तुम्ही बँकेच्या कॅपिटल गेन (Capital Gain) अकाउंट स्कीममध्ये जमा करू शकता. ➡️ संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
3
इतर लेख