AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जन धन खातेधारकांना फायदाच फायदा!
योजना व अनुदानAgrostar
जन धन खातेधारकांना फायदाच फायदा!
➡️केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये गरिबांना आर्थिक मदतीपासून ते मोफत रेशनपर्यंतच्या सुविधा पुरवल्या जातात.जन धन खाते असलेल्यांसाठी आता एक मोठी बातमी आहे. जन धन खातेधारकांना केंद्र सरकारकडून 10,000 रुपये दिले जात आहेत.देशातील 47 कोटींहून अधिक खातेदारांना याचा लाभ मिळणार आहे. ➡️47 कोटी लोकांना 10,000 रुपयांचा मिळणार लाभ: प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात 47 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. आता सरकार PM जन धन खात्यावर 10,000 रुपये देत आहे. यासोबतच, सरकारने या खात्यावर विम्याची सुविधाही दिली आहे. ➡️10,000 रुपये कसे मिळवायचे? जर तुम्ही जन धन खाते देखील उघडले असेल, तर तुम्हाला सरकारकडून ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळत आहे. या सुविधेअंतर्गत तुमच्या खात्यात एक रुपयाही नसला तरी तुम्ही 10,000 रुपये काढू शकता. याआधी ओव्हरड्राफ्टची सुविधा फक्त 5000 रुपये होती, पण सरकारने ही मर्यादा 10,000 पर्यंत वाढवली आहे. ➡️जाणून घ्या काय आहे योजनेची खासियत- >> 18 वर्षे ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. >> या योजनेचे पैसे वयाच्या 60 व्या वर्षी उपलब्ध आहेत. >> यामध्ये वार्षिक 36000 रुपये ट्रान्सफर होतात. >> असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळतो. >> तुमचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. ➡️अधिक माहितीसाठी समोरील लिंक वर क्लिक करा https://pmjdy.gov.in/ ➡️ संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
1