AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गावातच व्यवसाय सुरु करा आणि मिळवा भरघोस उत्पन्न!
व्यवसाय कल्पनाmaharashtradesha
गावातच व्यवसाय सुरु करा आणि मिळवा भरघोस उत्पन्न!
➡️ व्यवसाय करताना तो व्यवसाय शहरा ठिकाणी सुरु न करता आपल्या गावातच सुरु केला तर व्यवसायातून अधिक फायदा होऊ शकतो. खर्च अत्यंत कमी लागेल व फायदा चांगला मिळेल. ➡️ आपल्या गावातच व्यवसाय सुरु करून तुम्ही २ लाखांपर्यत कमाई करू शकता. हे दोन व्यवसाय तुम्ही सहज करू शकतात. कोल्ड स्टोरेज – ➡️ गावाकडे कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध नसते. अशावेळी शेतकऱ्यांची फळे तसेच भाजीपाला खराब होतो. असे असेल तर तुम्ही गावात राहून व्यवसाय करू शकता, स्वत:चे शीतगृह म्हणजेच कोल्ड स्टोरेज सुरू करू शकता. यासाठी थोडा जास्त खर्च येईल, परंतु या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकेल. बियाणे स्टोअर – ➡️ गावाकडे ९०% लोक शेती व्यवसाय करत असतात. लोकांना शेतीसाठी खते आणि बियाणांची गरज सतत लागत असते. तुम्हाला हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा ठरू शकतो कारण शेतकरी खतांची खरेदी वारंवार मागणी करत असतात. तुम्ही खत आणि बियाणांचे दुकान सहज उघडू शकता. तसेच खते आणि बियाणांवर सरकारकडून अनुदान दिले जाते, मिळणार्‍या अनुदानाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. व आपल्या व्यासायातुनही चांगली कमाई करू शकता. संदर्भ:-maharashtradesha, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
1
0
इतर लेख