AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस पिकामध्ये किडीवर प्रतिबंधात्मक उपाय !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकामध्ये किडीवर प्रतिबंधात्मक उपाय !
🌱कापूस पिकामध्ये विविध रसशोषक किडी, नागअळी, बोन्ड अळी सारख्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. रसशोषक किडी पानांमधील तसेच कोवळ्या फुटव्यामधील रस शोषण करतात त्यामुळे पाने गोळा होऊन झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. यावर उपाय योजना म्हणून कापूस बियाणे उगवून आल्यानंतर रसशोषक कीड नियंत्रणासाठी पिकात पिवळे व निळे कामगंध सापळे प्रत्येकी १० एकरी लावावे. तसेच बोन्ड अळीच्या नियंत्रणासाठी कापूस पिकात पाते दिसू लागताच कामगंध सापळे एकरी 5 लावावे. पीक 4 ते 5 पाने अवस्थेत असताना सुरुवातीला कटवर्म, रसशोषक कीड नियंत्रण आणि पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आंतरप्रवाही कीटकनाशक आणि पोषक यांची एकत्रित आळवणी करावी. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
6