AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील कंद कूज समस्या आणि उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
कांदा पिकातील कंद कूज समस्या आणि उपाय!
🌱जमिनीत जास्त काळ अतिरिक्त ओलावा आणि कमी तापमान असल्यास कांदा पिकात कंद कूज समस्या येते. रोगाची लागण झाल्यावर सुरुवातीला जुनी कांद्याची पात शेंड्याकडून पिवळी पडून जळून जाते. अश्या कांद्याच्या बुडाजवळ जमीनीलगत सफेद रंगाची बुरशी वाढते. 🌱कालांतराने मुळे आणि कंद काळा पडून कुजायला सुरु होतात. यावर उपाय म्ह्णून कांदा पिकास जमिनीतन वापसा राहील अश्या पद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. अतिरिक्त खतांचा वापर करणे टाळावा. पीक वाढीच्या अवस्थेत कॉपर ऑक्सि क्लोराईड बुरशीनाशक 500 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम बुरशीनाशक 500 ग्रॅम सोबतच ह्युमिक 500 ग्रॅम प्रति एकर खतांना चोळून जमिनीतून द्यावे अथवा पाण्यासोबत आळवणी करावी. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
4
इतर लेख